Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

पोलीसनामा ऑनलाइन : Apurva Nemlekar | छोट्या पडद्यावर चर्चेत असणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे टॉप फायनलिस्ट मिळाले आहेत. टॉप फायनलिस्टमध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यांचा समावेश आहे. तर या टॉप फाईव्ह फायनलिस्टमध्ये अपूर्वाने टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत बिग बॉसच्या चौथ्या परवाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. (Apurva Nemlekar)

अपूर्वा बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच खूपच चर्चेत होती. ती यंदाचा पर्व जिंकू शकते असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. आता लवकरच या खेळाचा विजेता जाहीर करण्यात येणार आहे. प्रेक्षक देखील बहुमताने अपूर्वाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. (Apurva Nemlekar)

अपूर्वाला जिंकवण्यासाठी तिचे चाहते विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत.
मुंबईच्या अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनरबाजीचे फोटो देखील लावण्यात आले आहेत.
जे सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत.
याचाच एक व्हिडिओ सध्या अपूर्वाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर अनेकांनी फ्लेक्स हातात घेऊन देखील ‘भरघोस मतदान करून अपूर्वाला विजयी करा’ असे आवाहन केले आहे.

2 ऑक्टोबरला बिग बॉसचे पर्व सुरू झाले होते. 16 स्पर्धकांपैकी आता केवळ पाच स्पर्धा शिल्लक राहिले आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात अपूर्वाची खेळी सगळ्यांनाच आवडत होती. तर आता येणाऱ्या 8 जानेवारीला या पर्वाची विजेती अपूर्वा होणार की आणखीन कोणी याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title :-Apurva Nemlekar | bigg boss marathi season four finalist apurva nemlekars fans supports her in unique style

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | ट्रोलर्सला अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना