Sania Mirza Retirement | सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना

पोलीसनामा ऑनलाईन – Sania Mirza Retirement | सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सानिया मिर्झाने याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथील सानियानं, महेश भूपती आणि लिएंडर पेस या पुरुष सहकाऱ्यांसह भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.

फेब्रुवारी (2023) महिन्यामध्ये दुबईत होणारी डब्ल्यूटीए 1000 स्पर्धा ही तिची शेवटची टेनिस स्पर्धा असणार आहे. मिश्र आणि महिला दुहेरीत सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया या महिन्याच्या (जानेवारी) शेवटी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. ही तिची शेवटची मोठी स्पर्धा असेल. यानंतर ती दुबईत होणाऱ्या डब्ल्यूटीए 1000 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. सानिया मिर्झा 2022 या वर्षाच्या अखेरीस निवृत्ती घेणार होती. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने काही काळ निवृत्ती पुढे ढकलली. (Sania Mirza Retirement)

सानिया मिर्झाने निवृत्तीनंतर दुबईमध्ये असलेल्या तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
सानियाने आपल्या कारकिर्दीत महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
तसेच 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.

Web Title :- Sania Mirza Retirement | sania mirza will retire from professional tennis after dubai wta 1000 event

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स