Arijit Singh | अरिजित सिंहने नुकतचं एका कॉन्सर्टदरम्यान ‘गेरुआ’ वादावर केले भाष्य ; म्हणाला, “भगवा रंग स्वामी विवेकानंदांचा”

पोलीसनामा ऑनलाइन : लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या खूपच चर्चेत आहे. नुकताच कोलकत्ता महोत्सव 2022 मध्ये झालेल्या त्याच्या कॉन्सर्टने तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. यावेळी त्याने शाहरुखच्या दिलवाले या सिनेमातील ‘रंग दे गेरुआ’ हे सुपरहिट गाणे गायले होते. मात्र या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली आहे आणि त्याची पुढची कॉन्सर्ट देखील रद्द करण्यात आली होती. आता अखेर अरिजितने (Arijit Singh) या गेरुआ वादावर भाष्य केले आहे.

18 फेब्रुवारीला कोलकत्ता येथे अरिजित सिंहची कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्ट दरम्यान त्याने गेरुआ वादावर मौन सोडले. यावेळी अरिजित म्हणाला “फक्त एका रंगावरून एवढा वाद का? भगवा रंग हा संन्याशी लोकांचा रंग आहे. स्वामी विवेकानंद यांचा रंग आहे. त्यांनी जर पांढरा रंग वापरला असता तर त्यावरून काही वाद झाला असता का?” असा प्रश्न अरिजित त्यांनी उपस्थित केला.

तर अरिजित सिंहला उत्तर देताना आमदार तापस रॉय म्हणाले की, “भगव्या रंगावर टीका करत नाही.
कारण हा रंग तर तिरंगाचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका”.
तर कोलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावेळी अरिजितने गेरुआ हे गाणे गायले यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. त्यानंतर अरिजितचे पुढचे कॉन्सर्ट रद्द करण्यात आले.
त्यामुळे भाजपने ममता सरकारवर भगव्या रंगाला घाबरल्याने पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा आरोप केला
आहे. तर यावेळी ममता यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
तर सध्या अर्जित सिंगच्या कॉन्सर्ट वरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

आजवर अरिजितने (Arijit Singh) आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे.
तर ‘मर्डर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून अरिजितने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
‘आशिकी 2’ या सिनेमातील गाण्यांनी तर त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.
त्यावेळी तो रातोरात स्टार झाला होता. ‘फिर भी तुमको चाहूंगा’, ‘पछताओगे’, ‘पल’, ‘खैरियत’, ‘सोच ना सके’,
‘इलाही’, ‘हमारी अधुरी कहानी’ यासारख्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे.

Web Title :- Arijit Singh | singer arijit singh talks about gerua row for first time said why so much controversy over saffron colour

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?