Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटला (Shinde Group) शिवसेना नाव (Shivsena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) मिळालं. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांच्यासह काही आमदारांनी विधानभवनातील (Vidhan Bhavan) शिवसेना पक्ष कार्यालयाचा सोमवारी (दि.20) ताबा घेतला आहे. याआधी ठाकरे गटाचा (Thackeray Group) या कार्यालयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. यानंतर गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटले आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यालयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न (Maharashtra Politics) करणार आहोत.

विधीमंडळामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला एक कार्यालय देण्यात आले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर विधीमंडळात मागील अधिवेशनात शिंदे गटाला वेगळे कार्यालय देण्यात (Maharashtra Politics) आले होते. मात्र आता निवडणूक आयोगाने शिंदे गटच शिवसेना असल्याचे जाहिर केल्यामुळे शिंदे गटाच्या आमदरांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय (Shiv Sena Party Office) ताब्यात घेतले. शिंदे गटाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्याने आता ठाकरे गटाचे आमदार कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आम्ही कायदेशीररित्या पक्ष कार्यालयात प्रवेश केला आहे, असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
तसेच याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना भवनही (Shiv Sena Bhavan) ताब्यात घेणार का?
असे विचारले असता गोगावले म्हणाले, नियमात बसणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत,
असे म्हणत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

Web Title :- Maharashtra Politics | shivsena party office in legislature taken over by shinde group now what about thackerays

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WTC | WTC फायनलमधून ‘हा’ संघ पडला बाहेर; भारतासमोर ‘या’ बलाढ्य संघांचे आहे आव्हान