Arjun Kapoor | “अर्जुन कपूरचे करिअर संपले असून तो फक्त घरात बसून मलायकाची…”, बॉलीवुड अभिनेत्याचा घणाघात

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध कपल अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) व अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हे नेहमी चर्चेत असतात. या लवली कपलला अनेकदा क्वालिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट केले जाते. मात्र त्यांच्यामध्ये अर्जुनचे वय मलायका (Arjun and Malaika Affair) पेक्षा कमी असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. हे कपल त्याची पर्वा न करता त्यांचे रिलेशन एन्जॉय करत असतात. मात्र आता बॉलीवुडच्या एक अभिनेत्याने अर्जुन कपूरवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता अर्जुन कपूरचे करिअर (Arjun Kapoor Career) संपलेले असून तो घरी बसून मलायकाची सेवा करतो असा गंभीर आरोप त्याच्यावर केला आहे.

 

 

 

 

अभिनेता अर्जुन कपूरने 2012 साली इशकजादे (Ishaqzaade) चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर अर्जुनने अनेक सिनेमे केले मात्र त्याचा कोणाताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
तो शेवटचा ‘एक व्हिलन रिटर्न’ (Ek villain return) या चित्रपटामध्ये झळकला होता.
त्यानंतर त्याने कोणताही सिनेमा केलेला नाही.
यावरुन बॉलीवुड अभिनेता व चित्रपट समीक्षक केआरके (Film Critic KRK) याने ट्वीट करत अर्जुनवर सडकून टीका केली आहे.
केआरकेने ट्वीट केले हे आहे की, “मी अर्जुन कपूरला म्हटलं होतं की जर तू अभिनेता बनू शकलास तर प्रत्येक भारतीय सुपरस्टार होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या ५ वर्षात तुझं करिअर संपेल, असा मला विश्वास आहे. आज अर्जुन कपूर घरात बसून मलायका अरोराची सेवा करत आहे,”

 

चित्रपट समीक्षक व अभिनेता केआरके हा नेहमी त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतो.
बॉलीवुडमधील अनेक अभिनेता. अभिनेत्री, दिग्दर्शक व चित्रपटांवर तो जहरी टीका करत असतो.
आता त्याने अर्जुन कपूरवर (Arjun Kapoor) निशाणा साधला आहे.
केआरकेच्या या ट्वीट (KRK Tweet) अनेकांचे रिप्लाय येत आहेत.
अभिनेता अर्जुन कपूर लवकरच चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘द लेडीकिलर’ (‘The Ladykiller’)
या चित्रपटामध्ये अर्जुन अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

 

 

Web Title : Arjun Kapoor | krk says arjun kapoor career finished he is serving malaika arora by sitting at home

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा