लग्नाच्या आधीच केली अर्जुन-मलायकाने ‘स्वीट होम’ची तयारी 

मुंबई : वृत्तसंस्था – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या संबंधाविषयी सध्या खूपच चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा त्यांनी स्वत: या चर्चेला दुजोरा देखील दिला आहे. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. मलायका व अर्जुनने घरही खरेदी केले आहे. मलायका व अर्जुनने मुंबईच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये डुप्लेक्स घर खरेदी केलं आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत.

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्यांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत.

दुबईतील निर्लज्ज अब्जाधीशाकडून ‘या’ भारतीय अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर

कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात अर्जुनला एक प्रश्न विचारण्यात आला होता की ‘तू सिंगल आहेस का यावर अर्जुनने पट्कन मी आता सिंगल नाही असे म्हटले होते.’ अर्जुनच्या या उत्तरामुळे त्याचे मलाईकाबरोबर असलेले नाते अधोरेखित झाले होते. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर,माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली.

पण अर्जुन -मलायका हे दोघे केव्हा कुठे लग्न करणार की ते लिव इनमध्ये राहणार यावर अद्यापपर्यंत या दोघांनी जाहीर भाष्य केलेले नाही.