Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) आजही सर्वांच्या लक्षात आहे. अरुणा सिनेसृष्टीत आज सक्रिय नसल्या तरी देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नायिकेसह खलनायकी भूमिका देखील उत्तमरीत्या साकारून प्रेक्षकांकडून कौतुक करून घेतले आहे. अरुणा यांनी आतापर्यंत 300 हून अधिक मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषिक चित्रपटात काम केले. त्याचबरोबर अनेक मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. अरुणा इराणी (Aruna Irani) यांनी अभिनेत्री रेखा यांच्या बद्दल 42 वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

अरुणा इराणी यांनी एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांना रेखा यांच्यामुळे ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.

यावेळी बोलताना अरुणा म्हणाल्या, “रेखाची आणि माझी खूप चांगली मैत्री होती. मी काही वर्षांपूर्वी मंगळसूत्र नावाचा चित्रपट करत होते. या चित्रपटात मी अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची भूमिका करत होते. यात पहिल्या पत्नीचा मृत्यू होतो आणि ती भूत बनते असे दाखवण्यात येणार होते. तर याच चित्रपटात रेखा ही अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारणार होती. मात्र एक दिवशी अचानक निर्मात्यांनी तुला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे असे सांगितले. यावेळी मी लगेच निर्मात्यांना भेटले आणि मला या चित्रपटातून का काढले जात आहे? काही समस्या आहे का? असे विचारले असता निर्मात्यांनी सांगितले की प्रामाणिकपणे सांगू तर रेखा यांना तुमच्या बरोबर काम करायचे नाही म्हणूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला”.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “रेखाला शूटिंग सुरू असतानाच विचारले की मी तुला चित्रपटात काम करायला नको आहे का? असे मला निर्मात्याने सांगितले यावर उत्तर देत रेखा म्हणाली की हो.
यानंतर मी तिला विचारले कारण काय? तेव्हा ती म्हणाली बघ अरुणा या चित्रपटात माझा अभिनय जरा वर खाली झाला असता तर मला लोकांनी खलनायक ठरवले असते. त्यामुळे तू ती भूमिका करावी असं मला वाटत नाही. त्यावर मी तिला म्हटले तुम्ही निर्मात्यांना सांगण्याआधी मला फोन करून किंवा प्रत्यक्षात भेटून का सांगितले नाही. तू हे फार चुकीचे वागलीस त्यावर रेखा म्हणाली काय करू शकते मला माफ कर. पण मी अजून काय करू शकते हा माझा करिअरचा प्रश्न आहे त्यामुळे मी हे केलं”.

अरुणा इराणी (Aruna Irani) यांनी आजवर अरुणा इराणी यांनी ‘बेटा’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘उपकार’, ‘लाडला’,
‘राजा बाबू’, ‘लावारीस’ यासारख्या चित्रपटात उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान
निर्माण केले आहे. या व्यतिरिक्त त्या ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘देखा एक ख्वाब’,
‘परिचय: नई जिंदगी के सपने का’ आणि ‘झांसी की रानी’ अशा टीव्ही शो मध्ये देखील झळकल्या होत्या.

Web Title :-  Aruna Irani | i asked her why aruna irani reveals rekha ousted her from cast of mangalsutra movie

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Jaya Bhardwaj | ‘या’ भारतीय क्रिकेटरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमके प्रकरण?