
Aryan Khan Drugs Case | आर्यन खान, अरबाज मर्चंटच्या बाबतीत मॉडलिंग करणार्या मूनमूनच्या वकिलांनी केला ‘हा’ मोठा दावा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाला (Aryan Khan Drugs Case) गंभीर वळण लागत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case ) त्याचा जवळचा मित्र अरबाज सेठ मर्चंट (Arbaaz Seth Merchant) आणि मूनमून धामेचा (Moonmoon Dhamecha) यांची 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी (NCB) कोठडीत रवानगी करण्यात आली. या तिघांकडे एनसीबीचे अधिकारी कसून चौकशी करत आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच मूनमून धामेचा हिच्या वकिलांनी महत्त्वाचा दावा केला आहे.
एनसीबीने समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) छापा टाकत शनिवारी या क्रूझवरील रेव्ह पार्टी उधळली होती.
या पार्टीत सहभागी झालेल्या आर्यन खान (Aryan Khan Drugs Case), अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना सर्वात आधी अटक (Arrest) करण्यात आली.
आता या हायप्रोफाइल पार्टीत (high profile party) सहभागी झालेली मूनमून धामेचा कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
आर्यन आणि अरबाज यांच्या ती आधीपासून संपर्कात होती का, या पार्टीत तिची काय भूमिका होती, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत मूनमूनचे वकील अनिल सिंह (Advocate Anil Singh) यांनी महत्त्वाचा तपशील आणि स्पष्टीकरणही दिले आहे.
आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही मूनमून ओळखत नाही. मूनमून ही मुळची मध्य प्रदेशातील सागर येथील आहे.
ती मॉडेलिंग आणि फ्री लान्स अँकरिंग करते. ती दिल्लीत होती परंतु कोरोनाच्या काळात ति सागर येथे राहण्यास होती.
नुकतीच ती कामाच्या निमित्ताने मुंबईत आली होती आणि तिला क्रूझवरील पार्टीच्या (Aryan Khan Drugs Case) आयोजनकांनी आमंत्रित केले होते, असा दावा सिंह यांनी केला.
मूनमूनचा ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. तसा तिचा पूर्वेतिहास नाही. छापेमारीत तिच्याकडून कोणताही अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला नाही.
असेही वकिलांनी सांगितले.
मूनमूनकडे 5 ग्रॅम ड्रग्स मिळाल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
त्याबाबत विचारले असता त्यात तथ्य नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Web Title : Aryan Khan Drugs Case | munmun dhamecha doesnt know aryan khan and arbaaz merchant says anil singh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Coronavirus | बेजबाबदारपणे वागाल तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन अटळ – ICMR
Shiba Inu Coin | 24 तासात ‘या’ क्रिप्टोकरन्सीमध्ये आली 45 टक्क्यांची ‘उच्चांकी’, जाणून घ्या कारण
CM Uddhav Thackeray | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CM उद्धव ठाकरे म्हणाले…