Shiba Inu Coin | 24 तासात ‘या’ क्रिप्टोकरन्सीमध्ये आली 45 टक्क्यांची ‘उच्चांकी’, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Shiba Inu Coin | क्रिप्टोकरन्सी बाजारात (cryptocurrency market) शिबा इनु कॉईन (SHIB) ने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. SHIB ने मागील सुमारे 24 तासात 45 टक्केपेक्षा जास्त उडी (Shiba Inu Coin) घेतली आहे.

SHIB टोकन 49 टक्के वाढले

शिबा टोकन मंगळवारपर्यंत 0.00001264 डॉलरवर व्यवहार करत होते तर त्याचे मार्केटकॅप (market cap) 4,987,163,972 डॉलर होते, जे सोमवारपासून सुमारे 49 टक्के वाढले आहे.
तर, सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सी (crypto currencies) च्या किमती सोमवारी खाली जात होत्या आणि काही इतर कॉईनच्या किमतीत किरकोळ वाढ झाली.

सोशल मीडियावर प्रचार

शिबा टोकन बनवणार्‍यांनी ते डॉजकॉईन (Dodgecoin) कडून प्रेरणा घेऊन बनवले आहे.
हे टोकन ठेवणार्‍या एका मोठ्या गटाने याचे सातत्याने समर्थन केले आहे आणि सोबत रेडिट आणि ट्विटर (Reddit and Twitter) सारख्या सोशल मीडिया (social media) वर यासाठी खुप प्रचार सुद्धा केला जातो. (Shiba Inu Coin)

शिबामध्ये का होत आहे वाढ?

क्रिप्टोचे जग खुपच अस्थिर आणि अनपेक्षित आहे. असे अनेकदा होते जेव्हा एखादे क्रिप्टो कोणत्याही कारणाशिवाय उच्च पातळीवर जाते.
मात्र, यावेळी शिबाच्या मुल्यात झालेल्या वाढीमागे टेस्लाचे सीईओ आणि डॉजकॉइनमधील गुंतवणुकदार (CEO of Tesla and investor) एलन मस्क (Alan Musk) यांचे ट्विट मानले जात आहे.

कुत्र्याच्या छायाचित्रामुळे वाढली कॉईनची किंमत

मस्क (Alan Musk) यांनी अलिकडेच आपला पाळीव कुत्रा ’फ्लोकी’चे छायाचित्र शेयर केले होते.
यानंतर कॉइनची किंमत खुपच कमी वेळात आकाशापर्यंत पोहचली होती.
यानंतर सोमवारी मस्क यांनी ’फ्लोकी फ्रंकपप्पी’ कॅपशनसह कुत्र्याचे आणखी एक छायाचित्र ट्विट केले ज्यामुळे टोकनच्या किमतीत अचानक उसळी आली.

डॉजकॉईनच्या लोकप्रियतेमध्ये जेव्हा पासून घट झाली आहे, अनेक यूजर्स शिबा इनु कॉइनला प्रोत्साहन देऊ लागले आहेत. ऐलन मस्कसुद्धा याचेच उदाहरण आहेत.

 

पण सध्या गुंतवणूक योग्य नाही – तज्ज्ञ

मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय टोकनच्या किमतीत अचानक वाढ होत असते तेव्हा गुंतवणूक करणे योग्य नाही.
अनेक प्रमुख गुंतवणुकदारांनी कॉईनच्या वाढीचे भविष्य वर्तवले आहे.

परंतु एक वर्षात यामध्ये केवळ 0.00018 पर्यंत उसळीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणताही प्रमुख क्रिप्टो बाजार तज्ज्ञ किंवा फर्म हा सल्ला देत नाही की कॉईन पुढील तीन ते चार वर्षात 1 डॉलरपर्यंत पोहचेल.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Shiba Inu Coin | crypto shiba inu coin shib jumps 45 percent in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Atul Bhatkhalkar | अमली पदार्थ तस्करीवरून भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘…महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?’ (व्हिडिओ)

CM Uddhav Thackeray | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना