Asaduddin Owaisi On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा ओवेसींनी घेतला समाचार, म्हणाले – ”कंडोमचा सर्वाधिक वापर करतात मुसलमान”

हैद्रराबाद : Asaduddin Owaisi On PM Narendra Modi | घुसखोर तो असतो जो विनापरवानगी एखाद्या देशात घुसतो. आमचा धर्म नक्कीच वेगळा आहे. पण आम्ही तर याच देशाचे रहिवासी आहोत. हा देश आमचा आहे. पंतप्रधान म्हणतात मुसलमान अधिक मुले जन्माला घालतात. पण खरे तर मुसलमानांचा प्रजनन दर घसरलाय. इतकंच नाही तर भारतात मुस्लीम पुरुष सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. हे मी नाही, तर सरकारचा रिपोर्ट सागंतो, असे म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धार्मिकद्वेषाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते हैदराबादमध्ये एका सभेत बोलत होते.(Asaduddin Owaisi On PM Narendra Modi)

जर काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संपत्ती त्या लोकांमध्ये वाटण्यात येईल, ज्यांची अधिक मुले आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका प्रचारसभेत केले होते. मोदींच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद देशात उमटत आहेत. यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधील सभेत मोदींचा समाचार घेतला.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी भाजप आणि आरएसएसची
माणसे अशा गोष्टी करतात. त्यांचे काम हे द्वेष वाढवणे आहे.
हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे की, देशातील मुसलमान बहुसंख्याक होतील.
पण सत्य तर हे आहे की, असे कधी होणार नाही. आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही या देशाचे आहोत.

काय म्हणाले होते मोदी…

राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानुसार
देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आता काँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती
मुसलमानांमध्ये वाटण्यात येईल. ही शहरी नक्षल मानसिकता आई-बहिणींचे मंगळसूत्र पण सोडणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण