Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On PM Narendra Modi | काल पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अतृप्त आत्मा असे म्हणत टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर टीका का केली, याचे कारण पाटील यांनी सांगितले. सणसर येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणुक (Baramati Lok Sabha) वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशात साम दाम दंड भेदाची निती वापरुन सत्तेवर येण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अडसर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांवर टीका केली.(Jayant Patil On PM Narendra Modi)

ते पुढे म्हणाले, शरद पवार यांना अपशब्द वापरल्याशिवाय मोदींना बोलता येत नाही. पंडीत नेहरुंपासून अटलबिहारी वाजपेयीपर्यंत भाषणे ऐकली. पण विरोधकांवर एवढ्या टोकाची टीका होताना आपण प्रथमच पाहत आहे.

जयंत पाटील म्हणाले, मोदींनी दहा वर्षात काय केले हे सांगावे. पुढील नियोजनाबाबत चर्चा करावी. मात्र, ते यावर बोलत नाहीत. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर प्रचंड चिडलेली आहे. कारण त्यांनी मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्याची शिक्षा त्यांना द्यायची आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विकासामुळे तुमच्या आमच्या
जीवनात बदल झाला. त्यामुळे पवारांनी काय केले हे त्यांनी विचारु नये. अमित शहांनी गुजरातसाठी काय केले हे सांगावे,
त्यामुळे देशाच्या ज्ञानात भर पडेल.

जयंत पाटील म्हणाले, जीएसटीसारखा जाचक कर देशाने सहन केला. देशात महागाई, इंधनदरवाढ मोठ्या प्रमाणात झाली.
त्यामुळे भाजपच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज आहे. देशातील बड्या प्रकल्पांचे काम उद्योगपतींना दिले जाते.
मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी या सरकारने मेहनत घेतली.

२२ लोकांकडे देशाची ७० टक्के संपत्ती गेली आहे. मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत देशावर ५६ लाख कोटींचे कर्ज होते.
गेल्या १० वर्षात ते कर्ज २१० लाख कोटींवर पोहचले आहे. कर्जामुळे देशाचे उत्पन्न वाढविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.
देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर २ लाखांचे कर्ज आहे. ते वसूल करण्यासाठी लुट चालू आहे,
असे पाटील म्हणाले.

सणसर येथे आयोजित या प्रचारसभेला आप्पासाहेब जगदाळे, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जलतज्ञ प्रफुल कदम,
भीमराव भोसले, आबासाहेब निंबाळकर, अ‍ॅड. तेजसिंह पाटील, सागर मिसाळ इत्यादी उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक अमोल भोईटे यांनी केले. अनिकेत निंबाळकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Sabha In Pune | काँग्रेस संविधानाचा अपमान करतेय, कर्नाटकात एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले, पीएम मोदींचा घणाघात

Punit Balan Group (PBG) – Constitution Park Pune | लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान !