आसारामची ‘ती’ ध्वनिफीत व्हायरल

जोधपूर : वृत्तसंस्था
बलात्कारप्रकरणी दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामची एक ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. यामध्ये तो एका व्यक्तीला दूरध्वनीवरून सुटकेबाबत आश्‍वस्त करत असल्याचे ऐकू येते.आसारामने “तुरुंगातील आपले दिवस लवकरच संपून चांगले दिवस येतील,’ असे म्हटले आहे.

आसारामने शनिवारी तुरुंग अधिकाऱ्यांच्या परवानगीने केलेल्या दूरध्वनीवरील हा संवाद रेकॉर्ड करून तो प्रसिद्ध केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आपल्याबरोबर शिक्षा झालेल्या दोघांची तुरुंगातून सुटका होण्यासाठी आपण आधी आतूनच प्रयत्न करू,असेही या संभाषणात ऐकू येते.