Ashish Shelar On Shivsena Uddhav Thackeray | आशिष शेलारांचे मोठे वक्तव्य, ”उद्धव ठाकरे हे मोदी-शहांशी संपर्क करतायत का…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ashish Shelar On Shivsena Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि शाह (Amit Shah) यांना संपर्क करतायत का, याबद्दल मी भाष्य करणार नाही. पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आमच्या विरुद्ध उभे आहेत, ते पाहता त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे बंद केले आहेत, असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला २०१६-१७ ला प्रस्ताव दिला होता, पण त्यांना शिवसेना सोबत नको होती, आम्ही तो मान्य केला नाही, ही आमची चूक झाली. त्यावेळी जर राष्ट्रवादीशी युती केली असती तर आज ही परिस्थिती नसती. ठाकरेंवर विश्वास ठेवणे ही आमची सर्वात मोठी चूक होती, त्यांनी आमचा विश्वासघात केला.

आशिष शेलार म्हणाले, शिंदेंनी नव्हे तर उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. म्हणूनच शिंदे आमच्या सोबत आले. आदित्य ठाकरेंच्या अहंकारापोटी आमची युती तुटली. आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टामुळे शिवसेनेने आम्हाला न विचारता २०१९ ला १५१ चा नारा दिला. ती गद्दारी नव्हती का? त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी माफी नाही.

राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याबात शेलार म्हणाले, एका ठाकरेला लांब केले आणि दुसऱ्याला जवळ, कारण दोघांमध्ये वैचारिक फरक आहे. राज ठाकरेंनी देशहितासाठी पाठिंबा दिला. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी केली. राज ठाकरेंना जागा मिळतील का नाही हे लवकरच कळेल. राज ठाकरे महायुतीसाठी निश्चित प्रचार करतील.

दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीबाबत आशिष शेलार म्हणाले, उत्तर मुंबईमध्ये पूनम महाजन यांनाच उमेदवारी द्यावी असे आम्ही पक्षश्रेष्ठींना सुचवले आहे, मला वाटते त्यांनाच उमेदवारी मिळेल.

महायुतीच्या जागावाटपाबाबत शेलार म्हणाले, ठाणे, नाशिक, मुंबईच्या जागांचा निर्णय लवकरच होईल. कोणती जागा कोणाची यापेक्षा कोण कोणत्या जागेवर निवडूण येऊ शकते हे पाहूनच उमेदवारी दिली जाईल.

केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास दिला जात असल्याच्या आरोपावर शेलार म्हणाले, ईडी, सीबीआयवर केंद्र सरकार दबाव नाही, ज्यांनी चोरी केली त्यांना जेलमध्ये जावे लागेल. गुन्हे सिद्ध झालेले कोणतेही नेते आमच्या सोबत नाहीत, जे सोबत आहेत. त्यांच्यावर जर आरोप सिद्ध झाले तर निश्चित कारवाई करु.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन पत्नीला मारहाण, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने वार; एकाला अटक

Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…