Pune News : लोहमार्ग पकडलेल्या अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड कनेक्शन ? तपास ATS करणार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नववर्षाच्या आणि 31 डिसेंबर 2020 पार्ट्यांसाठी दिल्लीहून आणलेले तब्बल 120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या तपासात अनेक धागेदोरे मिळाले असून यामध्ये बॉलीवूड कनेक्शन असल्याचे आढळून आल्याचे समजतय.

लोहमार्ग पोलिसांनी जप्त केलेला अंमली पदार्थ हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आणला होता. हे अमली पदार्थ पुण्यासह गोवा, मुंबई, नागपूर, बंगलोर या शहरातील पब, हॉटेलमध्ये नववर्षाच्या पार्टीमध्ये विकले जाणार होते. मात्र, या अमली पदार्थाची विक्री होण्यापुर्वीच पुणे लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 34 किलो चरस जप्त केले होते.

ADV

यासंदर्भात लोहमार्गचे पोलीस अधिक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, एका पेक्षा अधिक जिल्ह्यात जर गुन्ह्याची व्याप्ती असेल तर त्याचा तपास सीआयडीकडे दिला जातो. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या गुन्ह्याची व्याप्ती दोन पेक्षा जास्त जिल्ह्यात असेल तर याचा तपास राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवला जातो. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसबरोबर लोहमार्ग पोलीस तपास करणार आहेत.

मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी कारवाई केली होती. सध्या त्यांची महाराष्ट्र एटीएसमध्ये बदली करण्यात आली आहे. पुण्यात त्यांनी यापूर्वी एक अमली पदार्थ विरोधात कारवाई केली होती. यासह राज्यातील दहा अमली पदार्थांचे गुन्हे गृह विभागाने एटीएसकडे सोपवले होते. त्याचप्रमाणे पुण्यातील या गुन्ह्यात दोन पेक्षा अधिक राज्यांचा संबंध असल्याने हा गुन्हा एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.