Atul Bhatkhalkar | ‘प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट’, भाजप नेत्याची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे (Nathuram Godse) रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवले जातात. अस्थी जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला पुन्हा गोळ्या मारल्या जातात हे तुमचं हिंदुत्व (Hindutva) आहे का? याकूब मेननच्या कबरीचं (Yakub Menon Grave) काय करायचं ते केले पाहिजे. त्याचे समर्थन कोणी करणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचे काय ? हा प्रश्न संघ, भाजपला (BJP) विचारायला पाहिजे असा सवाल नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. यावरुन आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) वाक्य ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘प्रकरण अगदीच वाया गेलेलं आहे…. हे तर भोंदू हृदयसम्राट…’ असं म्हणत भाजप नेत्याने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) देखील हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘माझ्या उद्धवला सांभाळून घ्या असे बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आलं आहे. प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट…’ असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लादेन सारखं मेननच्या बाबतीत का केलं नाही?

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईट आहे.
त्याचे समर्थन कुणी करु शकत नाही. याकूब मेननची फाशी आणि त्यावरील अंमलबजावणी भाजप काळात झाल्या.
जर अमेरिकन सरकार (American Government) लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब
मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली असा सवाल त्यांनी
विचारला आहे.

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar slams shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Allu Arjun Net Worth | अबब ! आलिशान बंगला, लग्झरी गाड्या, महिन्याला ‘इतके’ कोटी कमावतो ’पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन

Pune Ganesh Visarjan-2022 | पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तरुणाईचा जल्लोष

Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार