Atul Bhatkhalkar | अमली पदार्थ तस्करीवरून भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘…महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईमध्ये नुकतीच एनसीबीने (NCB) मोठी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईवरुन भाजपचे आमदार (BJP MLA) अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर (state government) बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर एनसीबीने कारवाई केली. पण, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अंमली पदार्थाची तस्करी (Drug trafficking) होत असताना महाराष्ट्राचं अंमली पदार्थ विरोधी पथक (Maharashtra Anti-Drug Squad) आणि गृहमंत्री झोपले आहेत काय? असा परखड सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

अतुल भातकळकर म्हणाले, आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळंमुळं मुळासकट मोडीत काढण्याचं सोडून ठाकरे सरकार (Thackeray government) केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईसारख्या शहरात (Mumbai City) एवढी देशविघातक कृत्य होत असताना राज्याचा गृहविभाग (Home Department) केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने या विरोधात कारवाई करणं अपेक्षित असताना गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत असल्याची टीका भातखळकर यांनी केली.

भातखळकरांचा खोचक सल्ला

राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईमध्ये गुन्हेगारीने (Crime) पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणं, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. परंतु राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाच्या राजकारणात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईत वाढत असलेली अंमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष ध्यावं, असा खोचक सल्ला (Atul Bhatkhalkar) त्यांनी दिला आहे.

 

काँग्रेसवर साधला निशाणा

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यावेळी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. ते म्हणाले, एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खानसह (Aryan Khan) अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हे युवक अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. पण दुसरीकडं काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) व इतर प्रवक्ते तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे आहेत. जणू यामार्फत ते अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला काँग्रेसचा पाठींबा असल्याचं दाखवून देत असलाचे अतुल भातखळकर म्हणाले.

 

Web Title : Atul Bhatkhalkar | bjp leader Atul Bhatkhalkar criticizes maharashtra home minister dilip walse patil on drug trafficking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Yugal Suraksha Yojana | एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नीला मिळेल इन्श्युरन्स कव्हर, कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध; जाणून घ्या

Akhil Bhartiya Maratha Mahasangh | ‘या’ आरोपानंतर अखिल भारतीय मराठा महासंघात मोठा पेच, महासंघात फूट?

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना