पोलीसनामा ऑनलाइन – Atul Bhatkhalkar | शिवसेनेमध्ये बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक व एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये सतत ‘तू तू मैं मैं’ झालेली दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लींमध्ये झालेल्या G20 च्या शिखर परिषदेच्या (G20 summit) डिनरमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांचा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (UK PM Rishi Sunak) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोवरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जहरी टीका केली. जळगाव येथील सभेमध्ये बोलत असताना ठाकरे शिंदेंना उद्देशून म्हणाले की, ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. पण, काय बोलला त्यांना? कोणत्या भाषेत बोलला तेही सांगा. सुनक काय बोलले तुम्हाला कळलं का? चमकोगिरी करण्यासाठी नुसता फोटो आला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली. यावर आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या उडवलेल्या खिल्लीवर भातखळकर यांनी तुम्हांला तुमचे आमदार मराठीमध्ये सांगत होते ते तरी कळत होते का असा सवाल केला आहे. भातखळकर यांनी लिहिले आहे की, “आपले 40 आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना कळलं नाही ते आज ब्रिटनचे पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलले याची काळजी करताहेत. किती ही जळजळ…” अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीचे (MVA) सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पडल्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून निघाले.
अनेक नवीन समीकरणे राज्यामध्ये पाहायला मिळाली. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले.
त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) हे महायुती सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री झाले.
राष्ट्रवादीमध्ये देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट (Sharad Pawar group) निर्माण झाले आहेत.
त्यामुळे राज्याचे राजकारण हे बदलले असून नवी समीकरणे समोर आली आहेत.
दरम्यान भाजपाच्या अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा