औरंगाबाद जि.प. मध्ये ‘ट्विस्ट’ ! सत्तारांच्या नाराजीचा ‘परिणाम’, अध्यक्षपद ‘महाविकास’कडे मात्र उपाध्यक्षपद भाजपकडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काल गोंधळ झाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महाविकासआघाडीने आपला झेंडा फडकवला असला तरी आता नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मिना शेकळे यांचा विजय झाला असला तरी अब्दुल सत्तार यांच्या एका गटाने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले आहे.

पहिल्यांदा वृत्त होते की उपाध्यपदी शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी काजे यांची निवड झाली आहे. परंतु यानंतर आता भाजपला अध्यक्षपद मिळाले नसले तरी उपाध्यक्ष पद मात्र राखले आहे. भाजपच्या एल जी गायकवाड यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. परंतु सत्तारांचे बंड शमल्याची माहितीच नसल्याने आता मतदान करणाऱ्या सदस्यांची गोची झाली आहे.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते की त्यांचे सदस्य शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतील परंतु प्रत्यक्ष सभागृहात असे घडले नाही. सत्तार यांच्या सदस्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या देवयानी दोनगावकर यांना मतदान केले. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उमेदवारांना 30 – 30 मते मिळाली होती. त्यानंतर समान मतं मिळाल्याने चिठ्ठी काढून मतदान घेण्यात आले.

काल औरंगबाद जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. वैधानिक पेच निर्माण झाल्याने ही निवडणूक आज दुपारी 2 वाजता पुन्हा होणार होती. काल जि. प औरंगाबादच्या या निवडणूकीत काँग्रेसचे 6 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फुटल्याचे सांगितले जात होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/