‘नर्मदे.. हर हर’ पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चार वेळा नर्मदा परिक्रमा केलेले लेखक जगन्नाथ केशव कुंटे उर्फ अवधूतानंद यांचे गुरुवारी (दि.4) पुण्यात निधन झाले. कवी कृष्णमेघ कुंटे आणि संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांचे ते वडील होत. गुरुवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे. परिक्रमांच्या अनुभवावर आधारलेली ‘नर्मदे.. हर हर’ आणि ‘साधनामस्त’ ही दोन पुस्तके कुंटे यांनी लिहिली. त्यांची पाच पुस्तके पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनने प्रकाशित केली आहेत.

जगन्नाथ कुंटे लिखीत पुस्तके
धुनी, नर्मदे… हर हर, नित्य निरंजन, साधनामस्त, प्रकाशपुत्र