Azad Maidan riots case | आझाद मैदान दंगल खटल्यात अ‍ॅड उमेशचंद्र यादव-पाटील विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाईन (Policenama Online) –  Azad Maidan riots case | सन 2012 मध्ये आसाममध्ये विशिष्ठ अल्पसंख्य समुदायाची संख्या वाढत चालली आहे ह्या कारणाकरिता आसाममधील बोडो संघटनेच्या (Bodo Association in Assam) कार्यकर्त्यानी उग्र आंदोलन चालू केले होते. त्याची प्रतिक्रिया आणि निषेध नोंदविण्यासाठी मुंबईत रझा अकादमीने (Raza Academy) आझाद मैदानापर्यंत निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. Azad Maidan riots case | Appointment of Adv Umesh Chandra Yadav-Patil as Special Public Prosecutor in Azad Maidan riot case

सुरवातीला केवळ 1500 आंदोलक जमा होतील अशी अटकळ होती.
पण शुक्रवारचा दिवस असल्याने जवळपास चाळीस हजाराचा समुदाय आझाद मैदानात जमा झाला होता.
सदर जमाव हिंसंक होऊन त्यात जाळपोळ व लुटालूट होऊन दोन व्यक्ती मयत तर शेकडो व्यक्ती जखमी झाल्या होत्या (Azad Maidan riots case) .
त्यात काही महिला पोलीस कर्मचाऱयांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या त्याचप्रमाणे अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

तत्कालीन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे (Mumbai, crime investigation department) सोपविण्यात आला होता.

याप्रकरणी, गुन्हे अन्वेषण विभागाने एकंदर 80 आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते
व त्याअनुषंगाने मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे.

सदर प्रकरणाची व्याप्ती आणि गांभिर्य लक्षात घेऊन गृह खात्याने (Home Department) सरकार पक्षाची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील (Adv Umeshchandra Yadav-Patil) यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नेमणूक केली आहे.

यादव यांच्या नेमणुकीमुळे दंगलीत सहभागी असणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Web Title : Azad Maidan riots case | Appointment of Adv Umesh Chandra Yadav-Patil as Special Public Prosecutor in Azad Maidan riot case

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Union Cabinet Meeting | उद्या केंद्रीय कॅबिनेटची बैठक, महागाई भत्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

Pune Crime News | पुण्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात तिघांचा मृत्यू

Burglary in Pune | भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी आणि हडपसर परिसरात घरफोडया