B. G. Kolse Patil On BJP Modi Govt | मोदींनी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – B. G. Kolse Patil On BJP Modi Govt | गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपने (BJP) मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी‌ सरकार जाणार, हे‌ स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.(B. G. Kolse Patil On BJP Modi Govt)

पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha) काँग्रेस महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Congress), इंडिया आघाडीचे (India Aghadi Candidate) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

कोळसे पाटील म्हणाले, संविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालय, संसद नंतर आहे. निवडणुक आयोग, न्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रीया बदलली. मोदी शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले. निवडणुक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सितारामन् यांचे पती म्हणत आहेत. मुलभुत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वत:हून अॅक्शन घेते. मात्र, देशात मुलभुत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी जाणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव दिसत आहे. झोला घेवून जाता येणार नाही, त्यापूर्वी त्यांना केलेल्या ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल. त्यानंतर त्यांनी कुठे जायचे तिकडे जावे, असेही कोळसे पाटील म्हणाले.

मोदींसारखा खोटं बोलणारा नेता यापूर्वी कधी देशाने पाहिला नाही. नोटबंदीनंतर काळा पैसा देशात आला का ? खोटं बोलून लाचारांची‌ फौज पुढे बसवून हसायला लावणारे मोदी आहेत. धमकी देवून धंदा व चंदा‌ गोळा केला. दहा‌ते लाख‌ लोक‌ देश सोडून परदेशात स्थायीक झाले. देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या‌ वाटेने चालत असून त्यांना देशाची‌ चिंता आहे. वसंतदादा व इतर लोक कमी शिकलेले होते, तरीही त्यांनी संसद गाजवली. तशाच प्रकारे रविंद्र धंगेकर संसद गाजवतील, असेही कोळसे पाटील म्हणाले.

म्हणून पानसरे यांची हत्या झाली

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मी, एम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात “हु इज‌ करकरे” या आंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नये, म्हणून करण्यात आली. त्यानंतर त्याला “शिवाजी कोण होता?” या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडवण्यात आली.मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होती, ते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्य प्रकारे काम केले नाही, असेही कोळसे पाटील म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikas Thackeray On BJP Modi Govt | जनतेत मोदी व भाजप विरोधी लाट; नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांचे मत

Prithviraj Chavan In Pune | संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध – पृथ्वीराज चव्हाण