B.L. Verma On New Cooperative Policy In Pune | पुणे : केंद्र सरकार नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर करणार – केंद्रीय राज्यमंत्री बी.एल.वर्मा (Video)

पुणे : B.L. Verma On New Cooperative Policy In Pune | नवीन सहकार धोरण (New Cooperative Policy) तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरेश प्रभू समितीचा (Suresh Prabhu Committee) अहवाल लवकरच सादर होणार असून त्यानंतर लगेचच नवीन धोरण जाहीर केले जाईल अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा (B.L. Verma) यांनी आज पुण्यात दिली. (B.L. Verma On New Cooperative Policy In Pune)

पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार, व्यवस्थापन संस्था (Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management) अर्थात ‘व्हेमनिकोन’च्या (VAMNICOM) 55 आणि. 56 व्या तुकडीच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एकूण 118 जणांना यावेळी वर्मा यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात आले. सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आलोक अग्रवाल (IAS Alok Agarwal), संस्थेच्या संचालक हेमा यादव (Hema Yadhav) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (B.L. Verma On New Cooperative Policy In Pune)

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वर्मा पुढे म्हणाले की, या संस्थेतून पदवी. अथवा पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या 100 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे ही अभिमानाची गोष्ट असली तरी ग्रामीण भागाचा विकास करणारे उद्योजक या संस्थेतून निर्माण होण्याची खरी गरज आहे. सहकारातून समृध्दी हा मंत्र खऱ्या अर्थाने त्याच वेळी प्रत्यक्षात येणार आहे.

भारताची अर्थव्यवस्था लवकरच 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत झेप घेणार असून त्यात सहकार क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहील असा विश्वास वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. नव्या सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत वैकुंठ मेहता सारख्या संस्था मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले .

सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना वर्मा यांनी सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी केंद्राने घेतलेल्या अनेकविध निर्णयांची यावेळी माहिती दिली . ग्रामीण भारतातील विविध कार्यकारी सोसायट्या ना पेट्रोल पंप आणि गॅस अजन्सी देण्यास प्राधान्य दिले जाणार असून प्रत्येक गावात धान्य साठवणुकसाठी गोदामे उभारली जाणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

देशातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सहकार मंत्रालयाने अनेक निर्णय घेतल्याचे संयुक्त सचिव आलोक अगरवाल यांनी यावेळी सांगितले .

संस्थेच्या संचालक हेमा यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर रजिस्ट्रार व्हीं. सुधीर यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title :-B.L. Verma On New Cooperative Policy In Pune | Pune: Central government will announce new cooperation policy soon – Union Minister of State BL Verma (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Unseasonal Rains In Pune | काय सांगता ! होय, पुणे शहरात गारांचा पाऊस, हवामानशास्त्र विभागानं केला ‘यलो अलर्ट’ जारी

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख