Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Borghat Accident News | पुण्यातील (Pune) कार्यक्रम आटपून मुंबईला (Mumbai) जात असलेल्या एका बसला खंडाळा – खोपोली (Khandala Khopoli) दरम्यान अपघात झाला असून पुणे – मुंबई महामार्गावरील (Old Mumbai Pune Highway) बोरघाटात ही बस दरीत कोसळली. त्यात ८ जणांचा मृत्यु झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळ हा अपघात झाला. (Borghat Accident News)

 

 

मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील बाजी प्रभु वादक गट (झांजपथक) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त (Ambedkar Jayanti) आयोजित कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर ४० जणांचे हे पथक बसने मुंबईला परत जात होते. पुणे – मुंबई महामार्गावरील बोरघाट उतरत असताना शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील एका वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले व ही बस खोल दरीत कोसळली.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस (Raigad Police), महामार्ग पोलीस (Maharashtra Highway Police) घटनास्थळी रवाना झाले. खोल दरीत बस पडली असल्याने मदतीसाठी लोणावळा (Lonavala) व खोपोलीतील हायकर्स ग्रुप, आयआरबी पथक आले. त्यांनी खोल दरीत रश्शी लावून जखमींना वर आणण्यास सुरुवात केली. यामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार ८ जणांचा मृत्यु झाला असून २५ जखमींना वर काढण्यात आले आहे.  त्यांना खोपोलीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Raigad SP Somnath Gharge) यांनी दिली.

 

Web Title :  Borghat Accident News | accident news old pune mumbai highway bus collapsed in Borghat Khopoli Pune Mumbai raigad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा