नवी दिल्ली : B20 Summit 2023 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी म्हटले की, UK आणि कॅनडासारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही देशांसोबत विना शुल्क व्यापार (Duty free trade) लवकरच सुरू होईल. दिल्लीत सुरू असलेल्या B20 Summit 2023 मध्ये त्या म्हणाल्या, ही भारताची वेळ आहे आणि आम्ही सर्वांना संधी देऊ इच्छितो.
B20 परिषदेत, सीतारामन म्हणाल्या, FTA संदर्भात यूके आणि कॅनडा सारख्या देशांशी वाणिज्य मंत्रालयाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय, आम्ही युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) सोबत मुक्त व्यापार करारासंदर्भात पुढे जात आहोत. या असोसिएशनमध्ये युरोपातील चार प्रमुख देश लिकटेंस्टीन, नॉर्वे, आइसलँड आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. (B20 Summit 2023) B20 संमेलनाची सुरूवात २०१० मध्ये झाली आणि त्यात G20 देशांच्या कंपन्या आणि दिग्गज व्यावसायिक सहभागी होतात. मुक्त व्यापार करारामुळे उत्पादनांना शुल्काशिवाय प्रवेश मिळेल, ज्यामुळे त्यांच्या किमती टिकून राहण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल.
इन्फ्रा स्ट्रक्चर आहे विकासाची गुरुकिल्ली
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासावर विश्वास व्यक्त करताना अर्थमंत्री म्हणाल्या,
आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरील आमचा खर्च सातत्याने वाढवत आहोत.
इन्फ्रास्ट्रक्चर ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या जलद विकासाची गुरुकिल्ली बनेल.
याशिवाय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक देशाच्या आर्थिक प्रगतीला अधिक गती देईल.
बदलत्या वातावरणामुळे आमची गुंतवणूकही झपाट्याने वाढत आहे.
ऊर्जेच्या नवीन स्त्रोत आणि आणि आर्थिक विकासात त्याचा समावेश करण्याच्या धोरणावर वर काम सुरू आहे.
महागाई रोखणे मोठे आव्हान
अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असलेल्या महागाईचा उल्लेख केला.
त्या म्हणाल्या की, व्याजदर वाढवून काही प्रमाणात महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले,
परंतु त्यामुळे विकास दराचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे आर्थिक विकासावर परिणाम न होता महागाई नियंत्रणात
ठेवता येईल, असा मार्ग आम्ही शोधत आहोत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराचे परिणाम
चांगले असतील आणि एप्रिल-जूनमध्ये विकास दर खूपच चांगला असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
जग सहन करू शकणार नाही आर्थिक धक्का
जागतिक अर्थव्यवस्थेच्या संकटाकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, B20 परिषदेत सहभागी
झालेल्या प्रत्येक देशाचे प्रतिनिधी या गोष्टीवर सहमत आहेत की, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर
ग्लोबल सप्लाय चेनला आणखी एक धक्का बसला तर जागतिक अर्थव्यवस्था त्याचा सामना करू शकणार नाही.
आधीच ग्लोबल सप्लाय चेनवर परिणाम झाल्यामुळे संपूर्ण जग महागाईच्या गंभीरतेला सामोरे जात आहे.
त्यामुळे याला सामोरे जाण्यासाठी एकत्रित रणनीती आखली पाहिजे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा