Herbal Drinks For Weight Loss | सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्या ‘हे’ 5 हर्बल ड्रिंक्स, 1 महिन्यात कमी होऊ लागेल अवजड शरीर, लठ्ठपणा होईल दूर

नवी दिल्ली : Herbal Drinks For Weight Loss | लठ्ठपणा अनेक आजारांचे मूळ आहे. जास्त वजनामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार जसे टाईप २ डायबिटीज, हार्ट डिसीज होतात. हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात आश्चर्यकारक काम करतात. व्यायामासोबतच रोज सकाळी रिकाम्या पोटी या हर्बल ड्रिंक्सचे सेवन केल्यास निश्चितच एका महिन्याच्या आत स्लिम होऊ शकता. या हर्बल ड्रिंकबद्दल जाणून घेऊया (5 Herbal Drinks for Weight Loss).

१. मेथी-पाणी –

टीओआयच्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात करा. मेथीचे पाणी बनवण्यासाठी मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी गाळून प्या. दुसरा उपाय म्हणजे सकाळी मेथी पाण्यात उकळून घ्या आणि थंड झाल्यावर प्या. (Herbal Drinks For Weight Loss)

२. जिरे-पाणी –

जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नाही. तसेच जिरे-पाणी शरीर आणि मन दोन्ही दिवसभर ताजेतवाने ठेवते. इतरही फायदे होतात. (Herbal Drinks For Weight Loss)

३. आले-पाणी –

वजन कमी करण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी आले-पाणी सेवन करा. आले अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दिवसभर पोटाला आराम देतात.

४. हळद आणि काळी मिरी –

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर पाणी उकळून त्यात थोडी हळद आणि काळी मिरी पावडर टाका. त्यानंतर ते गाळून चहाप्रमाणे सेवन करा. महिन्याभरात शरीर बारीक होऊ लागेल.

५. तुळस-पाणी –

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पाण्यात मौल्यवान अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
तुळशीचे पाणी चहासारखे बनवा आणि सकाळी चहा ऐवजी तुळशीचे पाणी घ्या. वजनासह अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना