Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

अमरावती: पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या सर्व आमदारांसह 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला पुन्हा एकदा जाणार आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली. सर्व आमदार जात आहेत. म्हणून मी पण जात आहे. आम्ही नवस केला होता. त्यामुळे आमचे सरकार आले आहे. म्हणून आम्ही तिकडे जात आहोत, असे बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

आमची देवाकडे एवढीच मागणी आहे की, शेतकऱ्यांचे भले झाले पाहिजे. राज्यात दिव्यांग मंत्रालय झाले पाहिजे. सरकार पडले तरी चालेल, पण शेतकरी अडचणीत येता कामा नये, असे कडू यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांवर देखील भाष्य केले. आम्ही पण असेच म्हणत होतो की, सरकार पडले पाहिजे. ह्या सगळ्या भूलथापा आहेत. आमदार फुटले नाही पाहिजे, म्हणून असे विधान संजय राऊत आणि विरोधी पक्ष करत आहेत, असे कडू म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत बंड केल्यावर त्यांच्यासोबत शिवसेनेचे चाळीस आमदार आणि 10 अपक्ष
आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर विरोधकांनी भरपूर टीका केली होती.
त्यानंतर त्यांनी तिकडून गोवा गाठला आणि मग मुंबईत येऊन विशेष अधिवेशनात सरकार स्थापन केले.
त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा डोंगर झाडी आणि हॉटेलची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title :-  Bachchu Kadu | Bachchu Kadu’s reaction to Chief Minister Shinde’s return to Guwahati with 50 MLAs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update