Ajit Pawar | “परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही…”; अजित पवारांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) प्रकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, ओला दुष्काळ आणि हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आदी मुद्दे चर्चिले. अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विविध मुद्द्यांवरुन हल्लाबोल केला.

सत्ताधाऱ्यांमुळे पोलीस विभाग आणि मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग तणावाखाली काम करत आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना थेट सीएमओमधून आदेश येत असल्याचा आरोप त्यांनी केला. पवार म्हणाले, “शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Government) स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा लोड होता, नंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन 18 लोकांना मंत्रिमंडळात घेतले. महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police Department ) आणि प्रशासन देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जाते. पण सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे.’

पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “पोलीस सांगतात त्यांच्यावर दबाव आहे.
हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. पोलीस विभाग आणि मंत्रलायतील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी तणावात काम करतात.
त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट आदेश येतात. जनतेचा आजही पोलीस आणि प्रशासनावर विश्वास आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली परिस्थिती अशीच राहिली, तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही.”

Web Title :-  Ajit Pawar | police and officers in mantralaya in the state under tension due to shinde fadnavis government alleges opposition leader ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”