लॉकडाऊनचा फटका ? ‘बाहुबली’ प्रभासच्या डोक्यावर चक्क ‘एवढया’ हजार कोटींचं कर्ज, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईनः दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास बद्दलची एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. बाहुबली’ फेम प्रभासवर तब्बल 1 हजार कोटी रूपयांचे कर्ज असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे अनेकांचे कंबरडे मोडले. लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी ठप्प पडली. सुपरस्टार प्रभासलाही याचा मोठा फटका बसला. प्रभासच्या ‘युवी क्रिएशन्स’ आणि व्ही सेल्युलाइड या प्रॉडक्शन कंपनीला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे त्याच्यावर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. प्रभासच्या युवी क्रिएशन्स व व्ही. सेल्युलाईडवर सध्या 1 हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज असल्याचे समजते.

लवकरच प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे श्याम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे शुटींग युरोपमध्ये झाले असून 30 जुलैला रिलीज होणार आहे. राधे श्याम व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ईश्वर या तेलुगु सिनेमातून सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. पण प्रभास आता बॉलिवूड किंवा बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. बाहुबलीनंतर जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे.