Bajaj Housing Finance | येत आहे बजाज ग्रुपचा आणखी एक मोठा IPO, कागदपत्रे SEBI कडे जमा… जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : Bajaj Housing Finance | बजाज हौसिंग फायनान्सने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) आपले डीआरएचपी दाखल केले आहे, जे या गोष्टीचा संकेत आहे की, कंपनी आपला आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

कंपनी आपल्या आयपीओद्वारे ४ हजार कोटी रुपयांचा नवीन शेयर जारी करेल, याशिवाय बजाज हौसिंग फायनान्स जिची पॅरेंटल कंपनी बजाज फायनान्स आहे, ती ऑफर फॉर सेल विंडोच्या माध्यमातून ३ हजार कोटी रुपयांचा शेयर विक्री करेल. याची मंजूरी ६ जूनला बजाज हौसिंग फायनान्सने दिली होती. म्हणजे कंपनी एकुण ७००० कोटीचा आयपीओ लाँच करेल.

बुक-रनिंग लीड मॅनेजर
बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएफल सिक्युरिटीज लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल लिमिटेड… या कंपन्या आयपीओ बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत. बजाज फायनान्स आधीपासूनच बीएसई आणि एनएसईवर लिस्टेड आहे.

कंपनीच्या शेयरची प्राईस
बजाज फायनान्सच्या शेयरमध्ये शुक्रवारी ०.६२ टक्के वाढ झाली आणि तो ७३४०.५० रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेयरमध्ये एक वर्षात किरकोळ वाढ दिसून आली आहे.

कंपनीचा नफा
बजाज हौसिंग फायनान्सची पूर्ण मालकी, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हकडे आहे, तिची बजाज फायनान्समध्ये एकुण ५१.३४ टक्के भागीदारी आहे. ही एक कर्ज देणारी आणि एक नॉन डिपॉझिट हौसिंग फायनान्स कंपनी आहे, जी सप्टेंबर २०१५ पासून नॅशनल हौसिंग बँकेसोबत नोंदणीकृत आहे. आर्थिक वर्षात २०२३-२४ कंपनीला १७३१ कोटी रुपयांचा फायदा झाला होता जो मागील वर्षाच्या १२५८ कोटी रुपये ३८ टक्के जास्त आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली