Bank Holiday In September 2023 | सणांमुळे सप्टेंबर महिन्यात राहणार अनेक दिवस बॅंका बंद; जाणून घ्या बॅंकेचे वेळापत्रक

पोलीसनामा ऑनलाइन – Bank Holiday In September 2023 | रोजच्या आयुष्यामध्ये आता प्रत्येकाला बॅंकेचे व्यवहार हे अपरिहार्य झाले आहेत. त्यामुळे बॅंकेच्या सुट्ट्या जाणून घेणे (Bank Holiday In September 2023) हे अत्यंत आवश्यक बनले आहे. सध्या सणांचा काळ चालू असल्याने बॅंका अनेक दिवस बंद आहे. पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये (Bank Holidays) देखील सणांमुळे आणि बॅंकेच्या शनिवार, रविवार या सुट्ट्यांमुळे अनेक राज्यांमध्ये बॅंका बंद राहणार आहेत. पुढील महिन्याचे प्लॅनिंग करताना बॅंकेच्या या सुट्टांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

‘रिजर्व बॅंक ऑफ इंडिया’ (Reserve Bank of India) तर्फे सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही प्रायव्हेट बॅंका (Private Bank), पब्लिक सेंक्टर बॅंका (Public Sector Banks), परदेशी बॅंका (Foreign Banks) आणि सहकारी बॅंका (Cooperative Banks) अशी वेगवेगळ्या सेक्टरमधील बॅंकांना वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. तसेच राज्याप्रमाणे देखील या सुट्ट्या बदलणार आहेत. या सर्व बॅंकाना नॅशनल हॉली डे तसेच स्थानिक सण असल्यास रिजनल हॉडी डे मिळणार आहे. यामध्ये हे रिजनल हॉली डे राज्य सरकारमार्फत दिले जातात. तर नॅशनल हॉली डे देशातील सर्व बॅंकांना दिले जातात. देशभरामध्ये 6 सप्टेंबरला तारखेला कृष्ण जन्म (Krishna Janmashtami) तर 7 तारखेला दहीहंडी उत्सव (Dahihandi 2023) आहे. यामुळे अनेक बॅंकांना या दिवशी सुट्टी आहे. त्याचबरोबर 28 सप्टेंबर रोजी देशभरामध्ये ईद (Eid) साजरी केली जाणार असल्यामुळे देखील या दिवशी देशातील अनेक बॅंका या बंद राहणार आहेत. (Bank Holiday In September 2023)

खातेधाराकांना अचानक लागणाऱ्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी बॅंकेची कधीही गरज पडू शकते. त्यामुळे पुढच्या प्लॅनिंगसाठी बॅंकेच्या सुट्ट्यांचे दिवस माहिती असणे अत्य़ंत गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये 3 तारखेला रविवार तसेच 6 हा कृष्ण जन्म व 7 तारखेला दहीहंडी आहे. तसेच 9 तारखेला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे आणि 10 तारखेला रविवार आहे. तसेच 17 तारखेला रविवार आहे.

याचबरोबर काही रिजनल सुट्ट्यांचा देखील सप्टेंबर महिन्यामध्ये समावेश आहे. 18 तारखेला काही राज्यांमध्ये
वरसिद्धि विनायक व्रत असल्याने सुट्टी असणार आहे तसेच 19 तारखेला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023)
म्हणून देखील बॅंका बंद असणार आहेत. तसेच ओडिसातील नुआखाई मुळे तेथील काही बॅंका बंद राहणार आहेत.
23 तारखेला चौथा शनिवार आणि 24 तारखेला रविवार असल्याने बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत.
श्रीमंत शंकरदेव जयंती (Shrimant Shankaradev Jayanti) असल्यामुळे काही राज्यांमध्ये 25 तारखेला देखील बॅंका बंद
राहणार आहेत. 27 तारखेला पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस तर 28 तारखेला ईद आणि गणपती विसर्जन
(Ganpati Visarjan 2023) असल्याने बॅंका बंद राहणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big relief for IPS Rashmi Shukla, case related disclosure of confidential report closed