Bank Holidays in September 2023 | जन्माष्टमी ते गणेश चतुर्थीमुळे बँका अनेक दिवस राहतील बंद, पहा सप्टेंबरमध्ये १७ दिवसांची सुट्टीची यादी

नवी दिल्ली : Bank Holidays in September 2023 | आजपासून नवीन महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अनेक सण आणि जयंतीमुळे बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. अशावेळी, ग्राहकांच्या सोयीसाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने Reserve Bank of India (RBI) आधीच बँकांच्या सुट्टीची (Bank Holidays in September 2023) यादी जाहीर केली आहे (Bank Holidays September 2023).

२००० रुपयांच्या नोटा बदलणे तसेच इतर कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असल्यास, सप्टेंबरसाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी येथे अवश्य पहा. अन्यथा नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सप्टेंबरमध्ये बँका किती दिवस राहतील बंद
सप्टेंबरमध्ये जन्माष्टमी, जी-२० शिखर परिषद, गणेश चतुर्थी, मिलाद-ए-शरीफ आदींमुळे बँकांना १७ दिवस सुट्टी असेल. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक वेगवेगळी राज्ये आणि सणांनुसार सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. अलीकडेच, दिल्ली सरकारने जी-२० परिषदेच्या पाश्र्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी दिल्लीत सुट्टी जाहीर केली आहे. यात बँकांनाही सुट्टी असेल. बँकेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्याचे असेल तर खाली दिलेली सुट्ट्यांची (Bank Holidays in September 2023) यादी पाहूनच बँकेला भेट द्या.

सप्टेंबर २०२३ मध्ये या तारखांना बंद राहतील बँका –

  • ३ सप्टेंबर २०२३- रविवार (देशभरात बँकेला सुट्टी)
  • ६ सप्टेंबर २०२३- श्री कृष्ण जन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे बँका बंद राहतील).
  • ७ सप्टेंबर २०२३- श्री कृष्ण जन्माष्टमी (अहमदाबाद, चंदीगड, रायपूर, रांची, शिलाँग, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील).
  • ८ सप्टेंबर २०२३- जी-२० परिषदेमुळे दिल्लीत बँका बंद राहतील.
  • ९ सप्टेंबर २०२३- दुसरा शनिवार (देशभर बँका बंद राहतील).
  • १० सप्टेंबर २०२३- रविवार (देशभर बँका बंद राहतील).
  • १७ सप्टेंबर २०२३- रविवार (देशभरातील बँकांना सुट्टी असेल).
  • १८ सप्टेंबर २०२३- विनायक चतुर्थीमुळे बेंगळुरू, तेलंगणा येथे बँका बंद राहतील.

  • १९ सप्टेंबर २०२३- गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथील बँकांना सुट्टी असेल).
  • २० सप्टेंबर २०२३- गणेश चतुर्थी आणि नुआखाई (कोची आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील).
  • २२ सप्टेंबर २०२३- श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममधील बँकांना सुट्टी असेल).
  • २३ सप्टेंबर २०२३- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • २४ सप्टेंबर २०२३- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
  • २५ सप्टेंबर २०२३- श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल).
  • २७ सप्टेंबर २०२३- मिलाद-ए-शरीफ (जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद).
  • २८ सप्टेंबर २०२३- ईद-ए-मिलाद (अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँकांना सुट्टी).
  • २९ सप्टेंबर २०२३- ईद-ए-मिलाद-उल-नबी (गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील).

असे पूर्ण करा काम –
बँका हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशावेळी बँकांना भरपूर सुट्ट्या आल्यास अनेक वेळा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी, सुट्टीच्या दिवशी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा यूपीआय वापरू शकता. याशिवाय पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करू शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ

Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल