Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल

नवी दिल्ली : Rules Changed From 1 September 2023 | प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही आर्थिक नियमांमध्ये (Financial Rules) बदल होतात. १ सप्टेंबरपासून अनेक नियम बदलत आहेत, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होणार आहे. आजपासून आयपीओच्या (IPO) लिस्टिंगपासून क्रेडिट कार्ड (Credit Card) फी पर्यंत अनेक नियमात बदल होत आहे. १ सप्टेंबरपासून कोण-कोणत्या नियमांचा (Rules Changed From 1 September 2023) आपल्यावर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया…

१- कर्मचाऱ्यांना लाभ
असे कर्मचारी जे कंपन्यांकडून मिळणाऱ्या फ्री-रेंट होमचा (Free-Rent Home) फायदा घेतात त्यांच्यासाठी १ सप्टेंबर तारीख खुप महत्वाची ठरणार आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax Department) ने फ्री-रेंट अकोमोडेशन (Rent Free Accommodation) च्या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची आता जास्त बचत होईल. त्यांची इन हँड सॅलरी आता वाढेल.

२- अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर कमी सूट
अ‍ॅक्सिस बँकेचे मॅग्नस क्रेडिट कार्ड (Axis Bank’s Magnus Credit Card) वापरणाऱ्या लोकांसाठी धक्का आहे. बँक १ सप्टेंबरपासून स्पेशल डिस्काउंट देणार नाही. सोबतच नवीन क्रेडिट कार्ड धारकांना फी सुद्धा द्यावी लागेल. अ‍ॅक्सिस बँकेने ही माहिती वेबसाइटवर दिली आहे.

३- आयपीओ लिस्टिंगचे बदलत आहेत नियम
१ सप्टेंबरपासून आयपीओ लिस्टिंगची (IPO Listings) कालमर्यादा T+6 च्या ऐवजी T+3 झाली आहे. मात्र, सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांवर अवलंबून असेल की नवीन टाइम पीरियड घ्यायचा की जुने नियम अवलंबायचे. १ डिसेंबर किंवा त्यानंतर येणाऱ्या सर्व आयपीओला T+3 फॉर्म्युला अवलंबावा लागेल.

सप्टेंबरमध्ये ही कामे करा – (5 Changes In September 2023)

१- आधार कार्ड (Aadhar Card)
युआयडीएआयने (UIDAI) आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जुलैपासून वाढवून १४ सप्टेंबर केली होती.
अशावेळी जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर शेवटच्या तारखेची प्रतीक्षा करू नका.

२- २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याची तारीख जवळ
आरबीआयच्या (RBI) आदेशानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर झाल्या आहेत.
अशावेळी सेंटड्ढल बँकेने लोकांना २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
या नोटा जमा करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पुराव्याची गरज नाही.
सोबतच या नोटा खात्यात जमा करून ताबडतोब पैसे काढता येऊ शकतात. (Rules Changed From 1 September 2023)

३-आधार कार्ड देणे अनिवार्य
अल्प बचत योजनेशी आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. यानंतर खाते बद होईल.
अल्प बचत योजनेत गुंतवणुक करण्यासाठी ६ महिन्याच्या आत आधार कार्ड संबंधीत माहिती द्यावी लागेल.

४- डीमॅट नॉमिनेशन (Demat Nomination)
शेयर बाजारसंबंधीत (Stock Market) लोकांनी डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनीची नोंद करण्याची शेवटची तारीख
३० सप्टेंबर २०२३ आहे. ही तारीख यापूर्वी वाढवण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता कमी आहे.

५- एसबीआय वुई केयर स्कीम (SBI We Care Scheme)
सीनियर सिटीझनसाठी एसबीआयने स्पेशल एफडी स्कीम लाँच केली आहे.
या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. या स्कीममध्ये ७.५० टक्के व्याज मिळते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ