Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी सज्ज – कविता द्विवेदी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदासंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi) यांनी दिली आहे.(Baramati Lok Sabha)

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. दिव्यांग संचलित मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत.

दौंड विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून स्व. लाजवंती गॅरेला हायस्कूल खोली क्र.२, दौंड, दिव्यांग मतदान केंद्र- सरस्वती शाळा रावळगाव, खोली क्र.२, युवा संचलित मतदान केंद्र- सेठ ज्योतीप्रसाद प्राथमिक शाळा, दौंड,खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानोटा, खोली क्र.३ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून सेंट सेबॅस्टियन हायस्कूल, दौंड, खोली क्र.१ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, इंदापूर खोली क्र.१०, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर, खोली क्र.३, युवा संचलित मतदान केंद्र- नारायणदास रामदास विद्यालय, इंदापूर, खोली क्र.३, युनिक मतदान केंद्र- श्री. एन. आर. विद्यालय, इंदापूर, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून एन. आर. विद्यालय, इंदापूर, खोली क्र. १० याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून राधेश्याम एन अग्रवाल तांत्रिक विद्यालय, बारामती,
खोली क्र.१, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळेगाव बु, खोली क्र.३, युवा संचलित
मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
कोळेवस्ती, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून नवराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे,
खोली क्र.१ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून एमईएस वाघिरे विद्यालय, सासवड,
खोली क्र.३, दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येवलेवाडी,
खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनी जेजुरी, खोली क्र.१,
युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळदरी, खोली क्र.२ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून
ऑर्किड इंटरनॅशनल शाळा, खोली क्र.३ याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून शिवाजी विद्यालय, भोर, खोली क्र.७, दिव्यांग
संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोलावडे, खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- ब्लूरीज पब्लिक
स्कूल, हिंजवडी, ता. मुळशी, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
रायरेश्वर, ता. भोर खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून ब्लूरीज पब्लिक शाळा, खोली क्र.४ याप्रमाणे मतदान
केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून ज्ञानदीप इंग्रजी माध्यम शाळा, जुन्या टोलनाक्याजवळ, वडगाव बु., दिव्यांग संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सणसनगर, खोली क्र.१, युवा संचलित मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बहुली, खोली क्र.१, युनिक मतदान केंद्र- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोणजे, खोली क्र.१ आणि आदर्श मतदान केंद्र म्हणून स.क्र.१०, सन सिटी वडगाव बु. कम्युनिटी सभागृहासमोरील बाजूस टेनिस सभागृह याप्रमाणे मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.

मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येत्या ७ मे रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar On BJP Modi Govt In Pune | मोदी सरकारने फक्त भाजपाला मोठे केले; जनतेला रस्त्यांवर आणले – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

Murlidhar Mohol Rally In Karve Nagar Pune | मुरलीधर मोहोळ यांची कर्वेनगर परिसरात प्रचारफेरी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Murlidhar Mohol Rally In East Pune | पुणे महायुती भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीने पूर्वेकडील पुण्यात पुन्हा संचारला उत्साह

Cop Dies Of Heart Attack While On Duty | पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा हृदविकाराने मृत्यू