Rahu Gochar : 2021 मध्ये ‘राहू’पासून राहावे लागेल सावध, ‘या’ राशीवाल्यांना होऊ शकतो त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्योतिष शास्त्रात राहु ग्रहाला एक क्रुर आणि पाप ग्रह मानले गेले आहे. यास छाया ग्रहसुद्धा म्हणतात, कारण तो सौरमंडळात दिसत नाही. म्हणजे सौरमंडळात याचे अस्तित्व नाही. आपले जे 9 ग्रह आहेत, त्यामध्ये सूर्य आणि चंद्र तर प्रत्यक्ष दिसतात. 5 ग्रह – बुध, शुक्र, शनी, गुरू आणि मंगळसुद्धा टेलिस्कोपने पाहता येतात, परंतु राहु आणि केतु 2 छायाग्रह आहेत जे दिसत नाहीत, परंतु आपल्या जीवनाला प्रभावित करतात. कालसर्प दोषसुद्धा हेच दोन ग्रह मिळून बनवतात.

राहु जरी एक क्रुर आणि पापग्रह असला, तरी जर राहु कुंडलीत मजबूत स्थितीत असेल तर चांगले परिणाम देतो. रंकापासून राजा बनवतो, परंतु जेव्हा राहु खराब असतो तेव्हा राजाला सुद्धा रंक बनवतो, म्हणजे कपडे उतरवतो.

वैदिक ज्योतिषमध्ये राहु ग्रहाला कठोर वाणी, जुगार, प्रवास, चोरी, दुष्ट कर्म, त्वचा रोग, धार्मिक यात्रा इत्यादींचा कारक सुद्धा मानले जाते. ज्योतिषमध्ये राहु ग्रहाला कोणत्याही राशीचे स्वामीत्व प्राप्त नाही. परंतु मिथून राशीत तो उच्च असतो आणि धनु राशीत तो नीच भावात असतो. 27 नक्षत्रात राहु आद्रा, स्वाती आणि शतभिषा नक्षत्रांचा स्वामी आहे.

2021 मध्ये राहु सर्व राशींना प्रभावित करणार आहे. यावेळी राहुचे गोचर वृषभ राशीत आहे. 2021 मध्ये राहुचे कोणतेही राशी परिवर्तन नाही, परंतु राहु नक्षत्र परिवर्तन करेल. 2021 मध्ये राहु वर्षाच्या सुरूवातीला मृग आणि 27 जानेवारी 2021 ला राहु रोहिणी नक्षत्रात येईल. यानंतर राहु कृतिका नक्षत्रात गोचर करेल.

जाणून घेवूयात 2021 मध्ये कोणत्या राशीवर राहुचा कसा प्रभाव राहील –

मेष
मेष राशीवाल्यांना राहु यावर्षी पैशाच्या बाबतीत अचानक लाभ सुद्धा देईल आणि कुटुंबात आनंद कायम राहील. बुद्धी आणि शिक्षणासाठी राहुचे गोचर लाभ देईल.

वृषभ
राहु पूर्ण वर्षभर वृषभ राशीतच गोचर करेल. वृषभ राशीवाल्यांसाठी राहु प्रथम भावात बसून जीवनात उलथा-पालथची स्थिती बनवू शकतो आणि वर्षाच्या सुरूवातीला मानसिक तणाव देऊ शकतो. जोडीदाराशी सुद्धा वाद होऊ शकतो. थोडे सावध राहावे लागेल.

मिथुन
मिथुन राशीवर असाही शनी साडेसातीचा पाया सुरू आहे आणि या राशीवाल्यांना यावर्षी सांभाळून राहावे लागेल. राहुचे गोचर तुमच्या राशीत 12 व्या भावात होत आहे, जे अनावश्यक खर्च करू शकते. शत्रूंपासून सुद्धा सावध राहावे लागेल.

कर्क
कर्क राशीवाले सौभाग्यशाली राहणार आहेत. कारण या वर्षी राहुमुळे अनेक प्रकरणात यश मिळेल. राहु तुमच्या राशीत 11 व्या भावात गोचर करत आहे. पैशांचा चांगला लाभ मिळेल. शत्रूंवर मात कराल.

सिंह
सिंह राशीवाल्यांसाठी राहुचे गोचर दशम भावात होत आहे, जे नोकरदार लोकांना प्रमोशन देऊ शकते. जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत ते चांगल्या पॅकेजवर दुसर्‍या कंपनीत सुद्धा स्विच करू शकतात. धनलाभ सुद्धा होईल.

कन्या
कन्या राशीत राहुचे गोचर नवम भावात होत आहे. आई-वडीलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सावध सुद्धा राहावे लागेल. कारण मानसन्मानात सुद्धा कमतरता होऊ शकते. नक्षत्र परिवर्तनानंतर राहु काही प्रकरणात शुभ फळसुद्धा देऊ शकतो.

तुळ
तुळ राशीवाल्यांना राहुचे गोचर अष्टम भावात होत आहे, जे वर्षाच्या सुरूवातीपासून मानसिक ताण देऊ शकते. मृग नक्षत्रापासून राहु जेव्हा रोहिणी नक्षत्रात येईल, तेव्हा जीवनात उलथा-पालथची स्थिती निर्माण होईल. चुकीची संगत आणि अनैतिक कामापासून दूर राहावे लागेल.

वृश्चिक
वृश्चिक राशीवाल्यांसाठी राहु धनलाभाचा योग तयार करेल आणि प्रेमसंबंधात सुद्धा यश प्रदान करेल. आर्थिक समृद्धी येईल आणि इन्कमचा एखादा नवीन स्त्रोत सुद्धा तयार होईल. राहु प्रेमाच्या बाबतीत शुभ फळ घेऊन येत आहे.

धनु
धनु राशीवाल्यांना सुद्धा राहुचे गोचर उत्तम ठरणार आहे. शत्रुवर मात कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. परंतु आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागेल.

मकर
मकर राशीत राहुचे गोचर पंचम भावात होत आहे. शिक्षण आणि प्रेमसंबंधात राहु त्रास देऊ शकतो. या दरम्यान मानसिक तणाव सुद्धा कायम राहील. शिक्षणात बाधा येऊ शकते. नक्षत्र परिवर्तन झाल्यानंतर राहु काही बाबतीत आराम देऊ शकतो.

कुंभ
कुंभ राशीवाल्यांसाठी राहुचे गोचर चौथ्या भावात होत आहे. लोकांशी संबंध मधुर ठेवावे लागतील. जमीनसंबंधी लाभ होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

मीन
मीन राशीवाल्यांसाठी तिसर्‍या भावात राहुचे गोचर होत आहे, जे धाडस वाढवेल. तसेच लेखन आणि आयटी सेक्टरशी संबंधीत लोकांना चांगला लाभ प्रदान करेल.