×
Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Beed ACB Trap | 7 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी...

Beed ACB Trap | 7 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या प्लॉटच्या 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागून 7 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) अंबाजोगाई तलाठी प्रफुल्ल सुहासराव आरबाड Talathi Prafull Suhasrao Arbad (वय-30) आणि खासगी व्यक्ती नजीरखान उमरद राजखान पठाण (Nazir Khan Umrad Raj Khan Pathan) यांना बीड लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Beed ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. बीड एसीबीच्या पथकाने (Beed ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरातील शीतल बीअर बारच्या समोरील रोडवर केली.

याबाबत 46 वर्षाच्या व्यक्तीने शुक्रवारी (दि.23) बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Beed ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी प्रफुल्ल आरबाड यांच्याकडे कागदपत्रे सादर केली होती. तक्रारदार यांना टॅक्स पावती (Tax Receipt) न देता 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी आरबाड यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, तलाठी आरबाड याने 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. आरबाड याने खासगी व्यक्ती पठाण याच्या सह दुचाकीवर बसून तक्रारदार यांना त्यांच्या पाठीमागे येण्यास सांगून शीतल बिअर बारच्या समोरील रोडवर गाडी थांबवली.
आरबाड याने दुचाकी वर पाठीमागे बसलेले पठाण यांचेकडे पैसे देण्यास सांगितले.
पठाण यांनी पंचासमक्ष 7000 रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली व आरबाड यांना दिली.
पठाण याने लाचेची रक्कम मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात (Ambajogai City Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (SP Dr. Rahul Khade), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), बीड उपअधीक्षक शंकर शिंदे (Deputy Superintendent of Police Shankar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस (Police Inspector Amol Dhas),
पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश मेहत्रे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Beed ACB Trap | Talathi and private individuals in anti-corruption net while taking bribe of 7000 thousand rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Encroachment On Hills In Pune | येवलेवाडी परिसरात ‘डोंगरफोड’ करून ‘ओढे बुजवून’ वेगाने विकास कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते कायमच ‘खड्डयात’; बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासच अनियोजीत रस्त्यांच्या ‘घाट’

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News