Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडमध्ये (Beed Crime News) एक धक्कादायक घटना घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मामाच्या गावाला राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार (Diksha Babasaheb Shelar) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटदेखील (Suicide note) लिहिली आहे. (Beed Crime News)

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?

मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले… असे दिक्षाने आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक (Karkhel Budruk) येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. मृत दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने तिचे मामा तिचा सांभाळ करत होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्वजण शेतात काम करत होते. यादरम्यान घरी कोणी नसताना दिक्षाने 6 वाजेच्या सुमारास ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात (Ashti Police Station) आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title :-  Beed Crime News | beed girl end her life 13 year old girl ends life incident in beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू