तुम्हाला देखील असतील ‘या’ 3 समस्या तर आजपासूनच खाण्यास सुरूवात करा गाजर, जाणून घ्या

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  तुमच्या चेहऱ्यावरील चमक नाहीशी झाली आहे का? शरीरात अशक्तपणा आहे? अर्ध डोके दुखत आहे? की मोबाईल-लॅपटॉपमुळे डोळ्यांची समस्या उद्भवत आहे ? जर आपल्याबाबतीत असे होत असेल तर मग गाजर खाण्यास सुरुवात करा कारण हिवाळ्यात भाजीपाला खाणे फार महत्त्वाचे आहे.

आजच्या काळात आपल्यासमोरील समस्यांवरील उपचार हे पौष्टिक घटकांनी ठीक केले जाऊ शकतात. गाजर, हे एक अतिशय सामान्य आहे. परंतु, प्रत्यक्षात गाजर पौष्टिक गुणधर्मांची खाण आहे, कारण त्यात अशा प्रकारचे जीवनसत्त्वे असतात जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात.

ADV

१) डोळ्यांच्या दृष्टीसाठी

आजकाल लहान मुलांना चष्मा लागलेला आपण पाहतो. पौष्टिक कमतरतेमुळे डोळ्यांची समस्या उद्भवते. यासाठी आपल्याला देखील गाजर खाणे गरजेचे आहे आपण त्याचा रस देखील पिऊ शकता.

२) अशक्तपणा

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास चेहऱ्यावरील चमक नाहीशी होते. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. रस किंवा कच्चा गाजर खाणे अधिक फायदेशीर आहे.

३) मायग्रेन

ताणतणावामुळे डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये तीव्र वेदना होतात ज्याला मायग्रेन म्हणतात लोक औषधे खातात पण जर गाजरचे सेवन केले तर आराम मिळतो.

४) कर्करोग

गाजर जे खातात त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका कमी असतो. गाजरांमध्ये कॅरोटीनोइड, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे कर्करोगाच्या पेशी तयार होऊ देत नाहीत. ते खाल्ल्याने हार्ट स्ट्रोकचा धोकाही ६८ टक्क्यांनी कमी होतो.

५) रक्तदाब नियंत्रित राहते

गाजर यकृतासाठी फायदेशीर आहे. गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि ल्युटिन समृद्ध असतात जे रक्तदाब सामान्य, कोलेस्टेरॉल आणि हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात.

६) चेहरा चमकदार बनतो

गाजर किंवा त्याचा रस किंवा कोशिंबीर म्हणून खाल्ली तर त्वचेला नैसर्गिक चमक येऊन ती सुधारण्यास सुरुवात होईल.