चेहऱ्यावरील सुरकुत्या, नैराश्य आणि तणाव दूर करायचाय ? आवर्जून करा चॉकलेटचं सेवन ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान असो वा मोठा चॉकलेट हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का चॉकलेटचे आपल्या शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज या फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) चॉकलेटमध्ये कोको बीन हा प्रमुख घटक असतो. यात असलेल्या फ्लावनोल्समध्ये शरीरातील पेशींचं संरक्षण करण्याची क्षमता असते. फ्लावनोल्स या घटकामुळं वयस्कर व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यात सुधारणा घडवण्यासाठी मदत होते.

2) अचानक रक्तदाब कमी झाला असेल आणि चॉकलेट खाल्लं तर रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.

3) आजकाल अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण दिसून येतं. शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि त्यामुळं होणाऱ्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट फायदेशीर ठरतं.

4) चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेट बाथ, फेशियल पॅक आणि व्हॅक्स असे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

5) उतारवयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं, त्वचा निस्तेज होणं असे शारीरिक बदल होत असतात. मात्र चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चॉकलेटचं सेवन आवर्जून करावं.

6) नैराश्यग्रस्त असताना किंवा तणावात असताना जर चॉकलेट खाल्लं तर मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळं अशा स्थितीतून जात असाल तर चॉकलेटचं सेवन करणं कधीही फायदेशीर ठरतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.