जाणून घ्या ‘पीच फळ’ खाण्याचे ‘हे’ 8 मोठे फायदे ! अनेक आजार होतील दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपल्या विशिष्ट रंगासाठी पीच हे फळ फेमस आहे. बाहेरून फिकट नारंगी आणि थोडी पिवळ्या रंगाची छटा असणारं हे फळ आतून मात्र खूप मधाळ आणि मधुर आहे. मूळचं चीनमधील असणारं हे फळ एप्रिल ते जून पर्यंत भारतीय बाजारात पाहायला मिळतं. आज आपण याचे फायदे आणि कोणकोणत्या आजारांना हे फळ दूर करतं याची माहिती घेणार आहोत.

1) पीच हे फळ मधुमेहींना खाण्यासाठी योग्य आहे. कारण यात साखरेचं प्रमाण कमी आहे.

2) यात थोड्या प्रमाणात क जीवनसत्व असल्यानं अँटीऑक्सिडंटचं काम करतं.

3) यातील मुबलक प्रमाणात असणाऱ्या अ, ई, के जीवनसत्वामुळं डोळ्यांचे आजार जसे की, रातआंधळेपणा, मोतीबिंदू, नजर कमी होणं या प्रकारच्या सर्व तक्रारी कमी होण्यास मदत होते.

4) यात फ्लुराईड हा घटक असतो. यामुळं दातांचं आरोग्य सदृढ ठेवण्यास मदत होते. इतकंच नाही तर हे फळ हाडांची मजबुती कायम ठेवण्यात देखील खूप मदत करतं.

5) सायनासिटीसशी संबंधित आजारांवरही हे फळ चांगला उपाय आहे.

6) याचं रोज सेवन केलं तर त्वचेवर येणाऱ्या बारीक रेषा आणि पुळ्या यांचं प्रमाण कमी होतं. हेच कारण आहे अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.

7) याचा नैसर्गिक गर चेहऱ्यांवरील सुरुकुत्यांवर लावला तर त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत होते.

8) उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणात पोटॅशियम आणि कमी प्रमाणात सोडियम असलेलं अन्न खावं. पीचमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम नगण्य असल्यानं उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी याचं सेवन केलं पाहिजे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.