West Bengal : BJP खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा ‘सेक्स’ वर्कर म्हणून केला उल्लेख

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेत्री सायोनी घोषने शिवलिंग आणि देवी सरस्वती यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्या विरोधातील सूर उमटू लागला आहे. दरम्यान भाजप खासदार सौमित्र खान यांची जीभ घसरली असून त्यांनी सायोनी घोष हिचा उल्लेख सेक्स वर्कर म्हणून केला आहे. मी असे मानतो की देवी सरस्वती आणि शिवलिंगाचा अवमान करणारे लोकच खऱ्या अर्थाने सेक्स वर्कर्स आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. सायोनीने देवी सरस्वतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. पण मी सांगतो सायनी हीच खरी सेक्स वर्कर असून या वक्तव्यासाठी माझ्यावर केसही करू शकता असे ते म्हणाले.

पश्मिच बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका सभेदरम्यान खासदार सौमित्र खान यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी खासदार खान यांनी बेरोजगारीसह अन्य मुद्द्यांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सायकल देणार आहेत. परंतु आम्ही जर सत्तेत आलो तर प्रत्येक घरात स्कुटी आणि प्रत्येक घरात एक नोकरी देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी देऊन टाकले आहे.