Bhaag Beanie Bhaag Review : ‘कॉमेडियन’ बनण्यासाठी लग्नातून पळ काढते स्वरा भास्कर ! हसायला भाग पाडते ‘ही’ जर्नी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ची मोस्ट अवेटेड वेब सीरिज भाग बीनी भाग (Bhaag Beanie Bhaag) नेटफ्लिक्स (Netflix) वर 4 डिसेंबर रोजी रिलीज झाली आहे. यात तिनं एका स्टॅंडअप कॉमेडियनचा रोल साकारला आहे.

स्टोरी

स्वरानं यात बीनीची भूमिका साकारली आहे. तिला स्टँडअप कॉमेडियन व्हायचं असतं. परंतु तिच्या क्षमेतवर तिला पूर्ण विश्वास नाही. तिला एक नोकरी आहे. कॉमेडी ती हॉबी म्हणून करते. तिचा एक श्रीमंत बॉयफ्रेंड अरुण कालरा (वरुण ठाकूर) आहे जो तिच्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. तिचं आयुष्य छान सुरू आहे आणि ती एन्जॉय करत असते. अशात तिच्या आनंदावर तिचा बॉयफ्रेंड पाणी फिरवतो.

तो तिला लग्नासाठी प्रपोज करतो. ती अद्याप कॉमेडियन बनलेली नाही आणि जॉब सॅटीस्फॅक्शन मिळालेलं नाही अशात दुसऱ्यांना आनंदित करण्यासाठी ती लग्नासाठी होकार देते. यानंतर काही वेगळाच ड्रामा सुरू होतो.

अशात बीनी रोका सेरेमनीच्या दिवशीच घरातून पळून जाते. नोकरीवरही लाथ मारते. ती कॉमेडियन व्हायचं ठरवते. अशात एका NRI ची एंट्री होते. आता याचा काय रोल आहे, पुढं नेमकं काय काय होतं हे तुम्हाला सीरिजमध्येच कळेल. 6 एपिसोडची ही सीरिज आहे.

लहानपण मजेदार सीरिज

सीरिजची खास बात अशी आहे की, ही सीरिज फक्त 6 एपिसोडची आहे. ही सीरिज लहान आहे, यातील एपिसोडही 25 मिनिटांचे आहेत. एकाच वेळेत पूर्ण सीरिज पाहून होते. ही सीरिज पाहण्यासारखी आहे.

अ‍ॅक्टिंग

सीरिजमध्ये 5-6 पात्र आहेत. सर्वांनी कमाल केली आहे. सर्वांची अ‍ॅक्टिंगही शानदार आहे. लिडमध्ये स्वरा भास्कर आहे. पूर्ण सीरिजमध्ये स्वरा गाजली आहे. तिच्या पालकांची भूमिका गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) आणि मोना आंबेगावकर (Mona Ambegaonkar) यांनी साकारली आहे. त्यांनी पात्रांचं चांगलं मनोरंजन केलं आहे.

गिरीश आणि मोना यांची केमस्ट्रीदेखील चेहऱ्यावर स्माईल आणते. डॉली सिंह (Dolly Singh) नं बीनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. अमेरिकन अ‍ॅक्टर रवी पटेल (Ravi Patel) एनआयआरच्या तर वरुण ठाकूर (Varun Thakur) बॉयफ्रेंडच्या भूमिकेत आहे.

स्वराच्या या वेब सीरिजचं डायरेक्शनही चांगलं आहे. बांधून ठेवणाऱ्या या स्टोरीत एवढे नाटकीय मोड आहेत की, एकाच वेळी तुम्ही पूर्ण सीरिज पाहाल. प्रत्येक सीन रिलेटबल बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेवटी हलका फुलका मेसेजही देण्यात आला आहे. Abi Varghese, Debbie Rao, Ishaan Nair यांना चांगल्या डायरेक्शनसाठी क्रेडिट दिलं जाऊ शकतं. एकदा ही सीरिज पाहिलीच पाहिजे.