Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (Maharashtra Former Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सत्तासंघर्षावर जो निकाल आला त्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे. मगाली काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. न्यायालयाने निकाल देत असताना तेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची (Bhagat Singh Koshyari) भूमिका संशयास्पद होती असं म्हटलं होतं.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली. मात्र आज वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कोश्यारी हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला का गेले? त्यांच्या भेटीचे नेमके कारण काय, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.

 

https://www.facebook.com/photo/?fbid=809158210579711&set=pcb.809158247246374

 

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यापाल असताना त्यांचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि
महाविकास आघाडी सरकारसोबत (Maha Vikas Aghadi Government) अनेक खटके उडाले होते. तसेच या सरकारच्या कार्यकाळात आणि मविआच्या काळात महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) या महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापले होते. मविआने अनेकवेळा त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी केली होती.

Web Title : Bhagat Singh Koshyari | bhagatsinh koshyari meets chief minister eknath shinde at the varsha bungalow political discussions intensify

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Kerala Story News | ‘द केरला स्टोरी’च्या शो वरून पुण्यातील एफटीआयआय मध्ये तुफान राडा; निर्माता व दिग्दर्शकही उपस्थित

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात