भांडूपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले; दोघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भांडूपच्या टॅन्करोड परिसरातील पाटीलवाडीमध्ये सार्वजनिक शौचालय खचले आहे. या दुर्घटनेत चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

भांडुपमधील शौचालय खचलेल्या परसरात दाट नागरीवस्ती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू आहे.  त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करुन शौचालयाची मैला भरलेली टाकी रिक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. खचलेले शौचालय अतिशय रुंद मार्गावर असल्याने बचाव कार्यास अडथळे निर्माण होत आहेत.

खचलेल्या शौचालयाची टाकी साफ केल्यानंतर शौचालयात गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत ३ ते ४ चार जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी शोध कार्य झाल्यावरच जखमी व अडकलेल्या नागरिकांची आकडेवारी समोर येईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.