Coronavirus : जाणून घ्या नाकातून दिल्या जाणार्‍या कोविड-19 लसीवर काय म्हणाले भारत बायोटेकचे चेयरमन कृष्णा एल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत बायोटेकचे चेअरमन कृष्णा एल्ला म्हणाले की, जर नाकातून घेण्याच्या लसीचा डोस घेतला तर तुम्ही संसर्ग रोखू शकता. अशा प्रकारे प्रसाराची साखळी तोडू शकता. ही केवळ 4 थेंबांमध्ये दिली जाते. ती पोलिओचा डोस प्रमाणे आहे. एका नाकपुडीत 2 आणि दुसरीत दोन थेंब दिले जातील. आपण नाकाच्या लसीसाठी जागतिक स्तरावर टाय करू शकतो.

भारत बायोटेक नाकाच्या माध्यमातून देण्यात येणारी कोविड-19 विरोधी लस विकसित करत आहे, जिची पहिल्या टप्प्यातील चाचणी पुढील महिन्यात सुरू होऊ शकते. लस निर्माता कंपनीचे चेअरमन कृष्णा एल्ला यांनी म्हटले, भारत बायोटेक कोव्हॅक्सीनसह अन्य लसींच्या उत्पादनासाठी आणखी दोन युनिट उभारत आहे.

मला वाटते की, लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होईल. कारण ही एकाच वेळी दिली जाणारी लस असेल. क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया सुद्धा अपेक्षेप्रमाणे वेगाने सुरू आहे. एल्ला म्हणाले, कोविड-19 च्या येणार्‍या लसींचे इंजेक्शनद्वारे दोन डोस देण्याची आवश्यकता आहे आणि भारतासारख्या देशात 2.6 अरब सिरिंज तसेच सुयांची आवश्यकता भासेल ज्यामुळे प्रदूषणात सुद्धा वाढ होईल.

त्यांनी म्हटले की, भारत बायोटेकने अनेक गोष्टी लक्षात घेऊन एका नवीन ‘चिंप-एडिनो व्हायरस’ लसीसाठी सेंट लुईसमध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूलसोबत करार केला आहे जी कोविड-19 साठी नाकाच्या माध्यमातून एका डोसमध्ये दिली जाणारी लस असेल.