Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bharosa Cell Pune | शहरात पतीप्रमाणेच पत्नीकडूनदेखील पतीवर अत्याचार केला जात आहे. कारण, मागील काही काळात अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. शहरात दर अडीच तासाला पती-पत्नीच्या भांडणाची एक तक्रार दाखल केली जात आहे. विशेष म्हणजे महिलांप्रमाणेच पुरुषांकडूनही मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या तक्रारी करण्यात येत आहेत. (Bharosa Cell Pune)

 

बदल्यात काळात कौटुंबिक भांडणे सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची गरज दांपत्यांना भासते आहे. काही वेळा समुपदेशनाने अनेक भांडणे सुटतातदेखील, पण काही वेळा ही भांडणे सुटत नाहीत आणि त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. या प्रकारच्या समुपदेशनासाठी पुणे पोलिसांकडून भरोसा सेल सुरू करण्यात आले आहे. या भरोसा सेलकडे 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये आलेल्या तक्रारींची आकडेवारी समोर आली आहे. (Bharosa Cell Pune)

 

मागील काळात भरोसा सेलमध्ये शहरातील पती-पत्नीकडून एकूण 3193 अर्ज दाखल झाले आहेत.
एकूण 328 दिवसांमध्ये हे अर्ज दाखल झाले आहे. याच आकडेवारीनुसार रोज सुमारे 10,
तर साधारण अडीच तासांमध्ये एक अर्ज भरोसा सेलमध्ये दाखल होत आहे.
यामध्ये महिलांकडून अर्ज दाखल करण्याचे प्रमाण 2406, तर पुरुषांकडून 787 अर्ज आले आहेत. महिलांप्रमाणेच पुरुषही मोठ्या प्रमाणात अर्ज करत असल्याचे समोर आले आहे.

 

अनेकदा वकिलांकडूनदेखील पुरुषांना भरोसा सेलमध्ये तक्रार अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.
पुरुषांकडून मुख्यत: स्वतःच्या सुरक्षेसाठी अर्ज केले जातात.
पती-पत्नीपैकी दोघांपैकी कोणीतरी एकाने पुढाकार घेऊन अर्ज करावा,
यासाठीदेखील पुरुष सध्या तक्रार दाखल करत आहेत.

 

Web Title :- Bharosa Cell Pune | husband or wife complains against each other after every two and half hours in pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhondi Champya Trailer | भरत जाधव-वैभव मांगलेची तुफान कॉमेडी असलेला ‘धोंडी चंप्या; एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा