UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! सुरू झाली नवीन हेल्पलाईन सर्व्हिस,जाणून घ्या

नवी दिल्ली : ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक पारदर्शक आणि ग्राहक अनुकूल मॅकेनिझम (ओडीआर) विकसित करण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने बीएचआयएम युपीआयवर युपीआय-हेल्पची सुरुवात केली आहे. अशाप्रकारे आता बीएचआयएम युपीआय अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी त्यांच्या समस्यांचे निवारण चांगल्या आणि सोप्या पद्धतीने होऊ शकते.

युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इन्टरफेस यामध्ये तुमची मदत करू शकते. हे मोबाईल फोनद्वारे एका खात्यातून दुसर्‍यात ताडतोब पैसे पाठवण्याची सुविधा देते. अ‍ॅपद्वारे पेमेंट केवळ मोबाईलद्वारेच केले जाऊ शकते. युपीआयचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे मेंबर बँकेचे खाते असायला हवे. म्हणजे तुमची बँक युपीआय सुविधेचा वापर करण्याची परवानगी देत असेल.

सुरू झाली नवी हेल्प डेस्क

युपीआय-हेल्पच्या माध्यमातून बीएचआयएम युपीआय वापरकर्ता खालील कामांसाठी आपल्या अ‍ॅपचा वापर करू शकतात.

1. पेंडिंग ट्रांजक्शन्ससाठी स्थिती तपासणे.

2. अशा व्यवहारांसाठी तकार नोंदवा, जे प्रोसेस करण्यात आलेले नाहीत किंवा लाभार्थीला पैसे मिळालेले नाहीत.

3. मर्चंट ट्रांजक्शन्सच्या संबंधित तक्रार नोंदवा.

युपीआय-हेल्पच्या माध्यमातून व्यक्ती-ते-व्यक्ती (पी2पी) व्यवहारासाठी तकारी ऑनलाईन सोडवल्या जाऊ शकतात. याशिवाय, प्रलंबित व्यवहारांच्या प्रकरणात जिथे वापरकर्ता कोणतीही कारवाई करू शकत नाही, युपीआय-हेल्प अ‍ॅपवर व्यवहाराची अंतिम स्थिती ऑटो अपडेट करण्याचा सुद्धा सतत प्रयत्न करेल.

एनपीसीआयने भारतीय स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकच्या ग्राहकांसाठी बीएचआयएम अ‍ॅपवर या सेवेची सुरुवात केली आहे.

लवकरच पेटीएम पेमेंट्स बँक आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे ग्राहक सुद्धा युपीआय-हेल्पचा लाभ घेऊ शकतील. युपीआयमध्ये भाग घेणार्‍या अन्य बँकांच्या वापरकर्ते येत्या काही महिन्यात युपीआय-हेल्पचा लाभ घेऊ शकतील.