Bhumi Pednekar | भूमी पेडणेकर पुन्हा होतीये ट्रोल; रॅम्प वॉक करताना दिसत नाही कॉन्फिडेंट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही नेहमी लाईमलाईटमध्ये असते. भूमीचा चाहता वर्ग मोठा असला तरी ती चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अनेकदा भूमी ही तिच्या फॅशन वरुन सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. यावेळी देखील तिच्या एका रॅम्प वॉक मुळे ती ट्रोल होत आहे. भूमीने (Bhumi Pednekar) परिधान केलेला डिझायनर ड्रेस व तिची चालण्याची पद्धत दोन्ही देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले नाही.

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने अनेक चित्रपटांमध्ये जीवंत अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. भूमीचे सौंदर्य देखील चाहत्यांवर मोहिनी घालत असते. नुकतीच ती आईसीडब्ल्यू 2023 (ICW 2023) मध्ये वरुण बहलसाठी (Varun Bahl) रॅम्प वॉक केला. यावेळी तिने गोल्डन कलरचा वर्क असलेला डिझायनर गाऊन परिधान केला होता. तिच्या या गाऊनला हाय थाय स्लिट होती. या स्टाईलिश गाऊनमध्ये भूमीने रॅम्पवर एंट्री केली. मात्र तिच्या चालण्यामध्ये कोणताही कॉन्फिडेंस दिसून येत नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. भूमीच्या रॅम्पवरच्या (Bhumi Pednekar Ramp walk) चालण्याच्या पद्धतीने ती आता सोशल मीडियावर ट्रोल (Bhumi Pednekar Troll) होत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही सध्या तिच्या ड्रेसवरुन सतत ट्रोल होताना दिसत आहे. सध्या भूमीची फॅशन बदलली असून तिचे नवे लूक चाहत्यांना आवडलेले दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी ती एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावरुन देखील नेटकऱ्यांनी तिला सुनावले होते. यावेळी देखील तिच्या रॅम्प वॉकवरुन तिला नेटकरी सुनावत आहेत. अनेकांनी तिला कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, किती वेळ श्वास रोखून धरणार आहे तर दुसऱ्याने लिहिले आहे की, या पेक्षा मी नोर्मल चांगली चालते. भूमीच्या फ्लोअर टच गाऊन बद्दल एकाने लिहिले आहे की, आता ही रस्ता साफ करुन घेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : वाघोलीत वाईन शॉपवर रात्री 11.30 वाजता ‘राडा’; तरुणाच्या डोक्यात घातली बियरची बाटली