उद्या बजेटसह होणार आहेत ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्यावर देखील होईल परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या संसदेत बजेट सादर करतील. याशिवाय सुद्धा 1 फेब्रुवारीपासून अनेक मोठे बदल होणार आहेत, जे सामान्य माणसांच्या संबंधीत आहेत आणि त्यांचा परिणाम तुमच्यावर सुद्धा पडू शकतो. एक बदल बँकिंगशी संबंधीत आहे, काही बदल असेही आहेत जे थेट खिशावर परिणाम करतील. 1 फेब्रुवारीपासून काय-काय बदलत आहे ते जाणून घेवूयात…

बजेटमध्ये होऊ शकतात मोठे बदल
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मली सीतारामण आर्थिक वर्ष 2021-22 साठी सर्वसाधारण बजेट सादर करतील. भारतीय बजेट इतिहासात असे पहिल्यांदा होत आहे जेव्हा पेपरलेस बजेट सादर होईल. कोरोना संकटामुळे सरकारने पेपरलेस बजेट सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणसापासून उद्योग जगतापर्यंत सर्वांना या बजेटकडून खुप अपेक्षा आहेत. सरकारसुद्धा हेल्थ, कृषी आणि रोजगाराशी संबंधीत मोठ्या घोषणा करू शकते.

पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलतील
सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने फसवणुकीला आळा घालण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून मोठे पाऊल उचलले आहे. बँकेनुसार, 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम मशीन्समधून ट्रांजक्शन करू शकणार नाहीत.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत फेरबदल शक्य
देशातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकांच्या गॅसच्या किंमतीचे पुनरावलोकन करतात. अशावेळी कंपन्या उद्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर असे झाले तर सामान्य माणसाला महागाईचा मोठा फटका बसणार आहे.

ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सुविधा 1 फेब्रुवारीपासून सुरू
कोरोना महामारीमुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये ई-कॅटरिंग सुविधा मिळत नव्हती. परंतु आता कोरोनाची प्रकरणे कमी होत असल्याने, ट्रेनमध्ये सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. 1 फेब्रुवारीपासून आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू होत आहे. मात्र, सध्या ही सुविधा प्रवाशांना निवडक स्टेशन्सवर मिळेल. याशिवाय रेल्वेने अनेक मार्गावर फेब्रुवारीपासून ट्रेन चालवण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. मुंबईत सामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अनेक मार्गांवर हवाई सेवा सुरू
विमान प्रवाशांच्या संख्येत हळुहळु वाढ होताना दिसत आहे. एयर इंडिया आणि त्यांची लो कॉस्ट सब्सिडियरी एयर इंडिया एक्स्प्रेसने नव्या स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय उड्डाणांची घोषणा केली आहे. एयर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारीपासून 27 मार्च 2021 च्या दरम्यान त्रिची आणि सिंगापुरमध्ये रोजची विमान सेवा सुरू करणार आहे.

याशिवाय राजा भोज एयरपोर्टवरून इंडिगोचे अहमदाबाद आणि लखनऊ फ्लाइटची सुरूवात तीन फेब्रुवारीपासून होत आहे. ही दोन्ही विमाने 74 सीटर असतील. कोरोना व्हायरस पहाता भारताने मागील वर्षी 23 मार्चपासून आपली अंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा निलंबित केली होती.