Good News : ‘कोरोना’च्या लसीमुळे काही ‘बरे-वाईट’ झाल्यास आरोग्य विमा कंपन्या भरपाई देतील – IRDAI

नवी दिल्ली: IRDAI ने विमाधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. IRDAI ने सांगितले की कोरोनाची लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिऍक्शनझाल्यास कोणत्याही पॉलिसी धारकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले तर याची भरपाई इंश्योरन्स कंपनींना भारवी लागेल. तसेच असे ही म्हंटले आहे की विमा कंपन्या खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अटींनुसार उपचार देतील.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कंपन्यांकडे मागितले होते स्पष्टीकरण
पॉलिसी धारकांसाठी स्वतंत्र ग्राहक जागरूकता मंच beshak.org चे सीईओ महावीर चोपडा म्हणाले की IRDAI ने स्पष्ट सांगितले आहे की वॅक्सीन लावल्यानंतर होणाऱ्या कोणत्याही समस्येबाबत डॉक्टरकडे गेल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली तर त्यासाठी लागणार सर्व खर्च हेल्थ इंश्योरन्स कंपन्यांच्या पॉलिसी अंतर्गत केला जाईल. काही महिन्यांपूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंश्योरन्स कंपन्यांकडे स्पष्टीकरण मागितले होते की त्याच्या पॉलिसीमध्ये कोविड १९ वॅक्सीन रिऍक्शनवर उपचार केला जाईल अथवा नाही. IRDAI ने आज याचे स्पष्टीकरण दिले आहे.

असा करावा लागेल नुकसानीचा क्लेम
IRDAI च्या म्हणण्यानुसार कोविड १९ वॅक्सीन घेतल्यानंतर होणाऱ्या रिऍक्शनवरील उपचारांचा आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत समावेश केला जाईल. विमा नियमकाने हे स्पष्ट केले आहे की कोरोना लस रिऍक्शनच्या उपचारांच्या देयकासाठी दावा करण्यासाठी सामान्य रोगांप्रमाणेच प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागेल. सध्या देशात दोन लसी वापरल्या जात आहेत. त्यामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविशील्ड आणि भारताची बायोटेक लिमिटेडच्या कोवॅक्सीन यांचा समावेश आहे.