DGCA ची मोठी घोषणा ! 30 एप्रिलपर्यंत सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांना स्थगिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या भारतात पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अशावेळी नागरी विमानन महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लागू निलंबन 30 एपिल 2021 पर्यंत वाढवले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रतिबंध राहिल. सोबतच डीसीए कार्यालयाकडून सांगण्यात आले की, आवश्यकता वाटल्यास काही इंटरनॅशनल रूट्सवर संबंधित अथॉरिटीची मंजरी घेऊन उड्डाणे संचालित केली जाऊ शकतात.

आरोग्य मंत्रालयाने फेब्रुवारीच्या अखेरीस अनेक देशातून येणारी उड्डाणे आणि प्रवाशांसाठी सुधारित गाईडलाईन्सचा एक सेट जारी केला होता. ही गाईडलाईन्स ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडून येणार्‍या उड्डाणांद्वारे येणार्‍या सर्व अंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू करण्यात आली आली होती. नवी मानक संचालन प्रकिया 22 फेब्रुवारी 2021 पासून लागू केली होती. आता परदेशात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे वाढण्यासह भारतात सुद्धा पॉझिटिव्ह प्रकरणांची दररोज वाढणारी संख्या पहाता पुन्हा अंतरराष्ट्रीय उड्डाणावर तात्पुरता प्रतिबंध लावला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केली होती ही गाईडलाईन्स
आरोग्य मंत्रालयाकडून 22 फेब्रुवारीपासून लागू नियमांनुसार, सर्व अंतरराष्ट्रीय प्रवाशांना निर्धारित प्रवासापूर्वी ऑनलाइन एयर सुविधा पोर्टलवर कोविडसाठी स्व-घोषणा फॉर्म (एसडीएफ) जमा करायचे होते. प्रवाशांना ऑनलाइन पोर्टल www.newdelhiairport.in वर एक निगेटिव्ह COVID-19 RT-PCR रिपोर्ट सुद्धा अपलोड करावी लागत होती. सोबतच उड्डाणात बोर्डिंगच्यावेळी थर्मल स्क्रीनिंगच्या नंतरच संक्रमित नसलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जात होती. सर्व प्रवाशांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगच्या मानकांचे पालन करणे आवश्यक होते. सोबतच आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले होते.